मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 4th Mar: खोट्या गुन्ह्यात फसवणाराच जामीन मिळवून देणार! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Tharala Tar Mag 4th Mar: खोट्या गुन्ह्यात फसवणाराच जामीन मिळवून देणार! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 04, 2024 03:53 PM IST

Tharala Tar Mag 4th March 2024 Serial Update:एकीकडे प्रताप सुभेदार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक घडवून आणल्यानंतर आता महिपत शिखरे त्यांच्या जामिनासाठी उभा राहणार आहे.

Tharala Tar Mag 4th March 2024
Tharala Tar Mag 4th March 2024

Tharala Tar Mag 4th March 2024 Serial Update:ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपी शर्यतीत पुन्हा एकदा अव्वल ठरली आहे. या मालिकेतील धक्कादायक वळणांमुळे मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या अर्जुनच्या मागे लागलेलं संकटांचं चक्र थांबण्याचं नावच घेत नाहीये. सतत विचित्र आणि संकटमय परिस्थितीशी झुंज देणाऱ्या अर्जुनसमोर रोज नवनवीन आव्हानं उभी ठाकत आहेत. सध्या अर्जुनच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळलं आहे. ड्रग्जच्या खोट्या आरोपात अर्जुनच्या वडिलांना म्हणजेच प्रताप सुभेदार यांना अटक झाली आहे. महिपतने रचलेल्या या डावात आता सुभेदार कुटुंब अडकलं आहे.

अर्जुनचे वडील अर्थात प्रताप सुभेदार यांची एक औषध कंपनी आहे. याच कंपनीच्या एका गाडीमध्ये नार्कोटीक ड्रग्ज आढळल्याने आता प्रताप सुभेदार यांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र,हे ड्रग्ज प्रताप सुभेदार यांच्या गाडीत नेमके आले कुठून असा प्रश्न सगळ्या सुभेदार कुटुंबाला पडला आहे. याचा शोध घेत असताना आता अर्जुनला याचा सुगावा लागला होता. आपल्या वडिलांच्या गाडीमध्ये ड्रग्ज ठेवून त्यांना फसवण्याचं काम साक्षी आणि महिपत शिखरे यांनीच केल्याचे अर्जुन कळले आहे. अर्जुनला आधीपासूनच या गोष्टीचा संशय होताच. मात्र, आता चोरच शिरजोर होणार आहे.

Morrya Movie: 'मोऱ्या' चित्रपटाच्या प्रदर्शनातील अडथळा झाला दूर! 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

एकीकडे प्रताप सुभेदार यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक घडवून आणल्यानंतर आता महिपत शिखरे त्यांच्या जामिनासाठी उभा राहणार आहे. आपला खोटेपणा उघड व्हायच्या आताच, महिपत आणि साक्षी शिखरे चैतन्य आणि रविराज यांचा वापर करून खेळी आपल्या बाजूने करून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत. महिपतचा गुन्हा अर्जुनला कळला आहे, हे समजताच आता साक्षी चैतन्यला लाडीगोडी लावून रविराजकड घेऊन जाणार आहे. तर, प्रताप सुभेदार यांना खोट्या आरोपात अटक झाली असून, महिपत त्यांचा जामीन करण्यात मदत करतील, असे सांगणार आहे.

दुसरीकडे आपल्या वडिलांना लवकरात लवकर जामीन मिळावा म्हणून तुरुंगात पोहोचण्यासाठी अर्जुन सगळी घाई करत आहे. मात्र, अर्जुन तुरुंगात पोहोचण्याआधीच महिपत आणि साक्षी चैतन्य आणि रविराज यांना हाताशी घेऊन प्रताप सुभेदार यांना जामीन मिळवून देत, घरी घेऊन येणार आहेत. आता तुरुंगात पोहोचलेल्या अर्जुनला याबद्दल कळणार आहे. चिडलेला अर्जुन घरी येऊन पुन्हा महिपतला धमकावणार आहे. मालिकेत प्रेक्षकांना चांगलाच हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग