Tharala Tar Mag 4th Jan: अर्जुनला सायली शिवाय चैन पडेना! अखेर आईने फोन लावला अन्...-tharala tar mag 4th january 2024 serial update arjun miss sayali when she not at home ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 4th Jan: अर्जुनला सायली शिवाय चैन पडेना! अखेर आईने फोन लावला अन्...

Tharala Tar Mag 4th Jan: अर्जुनला सायली शिवाय चैन पडेना! अखेर आईने फोन लावला अन्...

Jan 04, 2024 02:48 PM IST

Tharala Tar Mag 4th January 2024 Serial Update: सायली घरात नसताना आता पावलोपावली त्याला सायलीची आठवण येत आहे. या दरम्यान आता अर्जुनची आई थेट सायलीला फोन करणार आहे.

Tharala Tar Mag 4th January 2024
Tharala Tar Mag 4th January 2024

Tharala Tar Mag 4th January 2024 Serial Update: छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ आता अतिशय रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत आता प्रेक्षकांना प्रेम फुलताना पाहायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन यांच्यात जरी दुरावा निर्माण झाला असला, तरी यामुळे त्यांच्यातील प्रेम आता वाढताना दिसणार आहे. सायलीच्या आठवणीत आता अर्जुन व्याकूळ झाला आहे. सायली घरात नसताना आता पावलोपावली त्याला सायलीची आठवण येत आहे. या दरम्यान आता अर्जुनची आई थेट सायलीला फोन करणार आहे.

सायली आणि अर्जुन यांच्यात काही छोटेसे वाद झाले होते. या वादांनंतर सायली घर सोडून आपल्या माहेरी निघून गेली, असं अर्जुनच्या आईने त्याला सांगितलं. जरी अर्जुन सायलीशी भांडला असला, तरी त्याला पावलोपावली सायलीची आठवण येत आहे. सायली घरात नसल्याने तो खूप व्याकूळ झाला आहे. साय्ल्लीशी भांडल्याने आता तो तिला फोन देखील करू शकत नाहीये. परंतु, त्याला सतत तिच्याशी बोलावं आणि तिला भेटावं वाटत आहे. अर्जुनच्या जीवाची हीच घालमेल आता त्याच्या आईला बघवत नाहीये.

Amala Paul: लग्नाच्या दोन महिन्यांतच अजय देवगणच्या अभिनेत्रीने दिली ‘गुडन्यूज’! फोटो शेअर करत म्हणाली...

अर्जुनला दुःखी झालेलं बघून आता त्याची आई हळूच सायलीला फोन लावणार आहे. अर्जुनची आई सायलीला व्हिडीओ कॉल करून आपल्याला तिची आठवण येत असल्याचे म्हणणार आहे. यावेळी आईने सायलीला फोन केल्याचे बघून अर्जुन देखील हळूच त्यांच्या मागे उभा राहून सायलीला चोरून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, आईच्या मागे मागे जाऊन तो सायलीला चोरून बघण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, आईची हे लक्षात आल्यावर ती थेट फोनची स्क्रीन अर्जुनच्या दिशेने वळवणार आहे.

आता अर्जुनच्या हातात फोन दिल्यावर सायली देखील आपलं तोंड फिरवून घेणार आहे. तर, पुन्हा अर्जुन आपल्याला कुणाशीही बोलायचं नाही, असं बोलून फोन ठेवून देणार आहे. दोघेही एकमेकांसाठी बैचेन होत असताना देखील एकमेकांशी रुसवा धरून राहणार आहेत.