Tharala Tar Mag: सायली घरी परतली अन् प्रियाची बोबडीच वळली! ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर-tharala tar mag 4 september 2024 serial update sayali returns home safely and take revenge from priya ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: सायली घरी परतली अन् प्रियाची बोबडीच वळली! ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर

Tharala Tar Mag: सायली घरी परतली अन् प्रियाची बोबडीच वळली! ‘ठरलं तर मग’ मालिका रंजक वळणावर

Sep 04, 2024 02:03 PM IST

Tharala Tar Mag 4 September 2024 Serial Update: गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये असलेली सायली आता सुखरूप घरी परतून येणार आहे. सायलीच्या येण्याने आता सुभेदार कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळणार आहे.

Tharala Tar Mag: सायली घरी परतली अन् प्रियाची बोबडीच वळली!
Tharala Tar Mag: सायली घरी परतली अन् प्रियाची बोबडीच वळली!

Tharala Tar Mag 4 September 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना एक अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये असलेली सायली आता सुखरूप घरी परतून येणार आहे. सायलीच्या येण्याने आता सुभेदार कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळणार आहे. सायलीची तब्येत सुधारली आणि तिला रुग्णालयातून लगेच सुट्टी देखील देण्यात आली आहे. मात्र, आता सायली घरी परतून आल्यामुळे प्रियाची बोबडी वळली आहे. सायलीसोबत नक्की काय घडलं होतं हे जर आता तिने सगळ्यांना सांगितलं तर, प्रियाच्या या घरातील स्थानाला मोठा धक्का बसणार आहे.

प्रियानेच सायलीला जिन्यावरून खाली ढकललं होतं. यामुळे जिन्यावरून पडलेली सायली गंभीर जखमी झाली होती. तिच्या मेंदूला मार लागला होता. यामुळेच ती काही दिवसांपासून बेशुद्ध होती. तिची ही अवस्था पाहून सगळेच घाबरून गेले होते. दुसरीकडे सायलीच्या जीवाला धोका आहे, म्हणजे ती आता काही जिवंत वाचणार नाही. तर, याच संधीचा फायदा घेऊन आपण प्रतिमाला आपल्या मार्गातून दूर करू शकतो, असा विचार प्रिया आणि महीपत यांनी केला होता. या प्लॅननुसार महीपतच्या गुंडांनी प्रतिमा आत्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला होता.

Tharala Tar Mag: सायली शुद्धीवर आली पण अर्जुन रागावला! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?

सायलीने प्रियाला भरला दम

दहीहंडीच्या गर्दीचा फायदा उचलून गुंडांनी प्रतिमावर हल्ला केला होता. मात्र, ऐनवेळी अर्जुनचं लक्ष गेल्याने प्रतिमा थोडक्यात बचावली होती. आता सायलीचाही जीव वाचल्याने ती सुखरूप घरी परतणार आहे. सायलीला घरी परत आलेलं पाहून आता पूर्णा आजी आणि अर्जुन यांच्या आनंदानं पारावार उरणार नाही. तर, प्रिया मात्र मनातून घाबरून जाणार आहे. घरी परत आलेली सायली आता प्रियाला तिच्याच भाषेत उत्तर देणार आहे. आजवर मी तुला एक साधी चिडलेली मुलगी समजत होते. पण, आता तू कुणाचाही जीव घेण्यापर्यंत पोहोचू शकतेस, हे मला कळलं आहे, असं सायली प्रियाला म्हणणार आहे.

सायली रौद्र रूप दाखवणार!

प्रिया पुन्हा एकदा अर्जुनच्या रूममध्ये जायचा प्रयत्न करत असताना सायली आता तिला अडवून, तिच्याच भाषेत उत्तर देणार आहे. सायली प्रियाला जिन्यावरून धक्का देऊन घाबरवणार आहे. मात्र, तिला खाली पडू न देता, सायली तिचा हात घट्ट पकडून ठेवणार आहे. सायलीचा हा नवा अवतार पाहून प्रियाची बोबडी वळणार आहे. आता सायली पुढे काय करणार, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.