Tharala Tar Mag 4 July 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन आणि सायली यांना प्रियाचा व्हिडीओ बघून धक्का बसला आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आज प्रिया गायब झाल्यामुळे किल्लेदारांसह सुभेदार कुटुंबात देखील गोंधळ होताना दिसणार आहे. आजच्या भागाच्या सुरुवातीला अर्जुन आनंदाने बेडवर गडाबडा लोळताना दिसणार आहे. सायलीने अर्जुनला गुड बॉय म्हणून दहा मार्क दिल्याने तो खूप खुश झाला आहे. मात्र, या आनंदाच्या भरात तो पुन्हा एकदा सगळा बेड विस्कटून टाकणार आहे. बेड आवरल्यामुळेच त्याला हे १० मार्क मिळाले होते, याचाच विसर त्याला पडणार आहे. मात्र, आपली चूक लक्षात येताच तो सायलीला सॉरी म्हणणार आहे.
अर्जुनला इतकं खुश बघून सायली देखील आनंदी होणार आहे. एकंदरीत सुभेदारांच्या कुटुंबात आनंदी आनंदाचं वातावरण असतानाच एक मोठा बॉम्ब फुटणार आहे. अर्जुनच्या मोबाईलवर एक असा व्हिडीओ येणार आहे, ज्यामुळे सुभेदारच नाही तर सगळेजण गोंधळून जाणार आहेत. अर्जुनच्या मोबाईलवर आलेला हा व्हिडीओ प्रियाचा असून, यामध्ये प्रियाने आपल्याकडून चूक झाल्याचे कबूल केले आहे. आश्रमातील खून हा मधुभाऊंनी नाही तर साक्षीनेच केला आहे, हे देखील प्रिया कबूल करणार आहे. साक्षीने आपल्याला पैशाचं आमिष दिल्यामुळेच आपल्याला खोटं बोलावं लागलं, पण आता आपण माफीची साक्षीदार व्हायला तयार आहे, असं म्हणत प्रिया आपल्या गुन्ह्याची कबुली देणार आहे. हा व्हिडीओ पाहून आता सुभेदार तर गोंधळले आहेतच. मात्र, महिपत आणि साक्षी यांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे.
साक्षी या व्हिडीओमुळे प्रचंड घाबरली आहे. प्रियाने या व्हिडीओतून आपणच खून केल्याचा पुरावा दिल्यामुळे, आता मला फाशीची शिक्षा होणार, असं म्हणत साक्षी रडून गोंधळ घालत आहे. मात्र, तुझा बाप जिवंत असेपर्यंत तुझ्या केसालाही कोण हात लावू शकत नाही असं म्हणत महिपत तिला दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, यानंतर महिपत आपल्या गुंडांना फोन करून प्रिया जिथे असेल तिथून तिला शोधून काढा, असा आदेश देणार आहे. दुसरीकडे अर्जुन आणि अश्विन सायलीला घेऊन रविराजच्या घरी पोहोचणार आहे.
रविराजच्या घरी गेल्यावर प्रिया आधीपासूनच तिथून गायब असल्याने, सगळेच टेन्शनमध्ये असलेले त्यांना दिसणार आहेत. यानंतर अर्जुन प्रियाचा व्हिडीओ रविराजला देखील दाखवणार आहे. प्रियाच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे, हे कळताच आता रविराजला देखील धक्का बसणार आहे. आधीच आपण आपली पत्नी गमावली, आता आपली मुलगी आपल्यापासून दूर जाणार, अशी भीती त्याला वाटत आहे. दुसरीकडे, आजी अर्जुनला प्रियाबद्दल काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असते. मात्र, चिडलेला अर्जुन आजीवरच रागावणार आहे आणि तिला प्रियाचे कारनामे सांगणार आहे.
संबंधित बातम्या