‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. सायलीने अक्ख्या सुभेदार घराला लाल रंगात का रंगवलं आहे, या प्रश्नाचे उत्तर अखेर सगळ्यांना मिळाले आहे. अर्जुनचं कपाट आवरत असताना सायलीला त्यात लाल रंगाचा शर्ट दिसला होता. अर्जुनला कधीच या अशा रंगाच्या शर्टात पाहिलं नसल्याने तिला या शर्टबद्दल कुतूहल वाटलं. त्याबद्दल सायली अर्जुनला विचारते. तर, अर्जुन लाल आपला आवडता रंग असल्याचे तिला सांगतो. अर्जुनला लाल रंग आवडतो, हे कळल्यावर सायलीने अवघं घरच लाल करून टाकले.
महिपत विरोधातील सगळे पुरावे जमा करून, कोर्टात सादर करून महिपतला शिक्षा घडवल्यानंतर सायली अर्जुनवर खुश झाली आहे. आता मधुभाऊंची केस देखील लवकरच सुटेल, असा विश्वास तिला वाटत आहे आणि म्हणूनच अर्जुनला थँक्यू म्हणण्यासाठी तिने अर्जुनच्या आवडत्या रंगात अवघ्या घरालाच रंगवून टाकलं आहे. दुसरीकडे, प्रियाच्या आयुष्यात आता काही मोठ्या घडामोडी घडत आहे. रविराज किल्लेदार यांनी आपली लेक तन्वी समजून सगळी प्रॉपर्टी प्रियाच्या नावावर केली आहे. सुरुवातीला प्रिया आपण केवळ प्रॉपर्टीसाठी तन्वी असल्याचा खोटं नाटक करतोय, असं कुणाला कळू नये म्हणून प्रॉपर्टी घेण्यास नकार देते.
मात्र, प्रियाचा हा खोटा नकार बघून चिडलेला नागराज तिला प्रॉपर्टी घेण्यासंदर्भात धमकावतो. तर, रविराज देखील भावूक होऊन सगळी प्रॉपर्टी प्रियाच्या हवाली करतो. सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर झाल्यामुळे प्रिया मनातून आनंदून गेली आहे. मात्र, नागराज आता प्रियाला चांगलंच खडसावणार आहे. रविराजने प्रॉपर्टीचे सगळे पेपर प्रियाकडे दिल्यावर नागराज प्रियाकडे जाऊन ते कागद हिसकावण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, प्रिया मात्र प्रॉपर्टीचे कागद नागराजला देण्यास नकार देणार आहे. या वेळेस दोघांमध्ये बाचाबाची होणार असून, नागराज प्रियावर हात उचलणार आहे. तर घाबरलेली प्रिया आता नागराच्या हाती सगळे प्रॉपर्टीचे पेपर देऊन, त्याच्याकडे असलेल्या कोऱ्या कागदांवर देखील सही करणार आहे.
तर, सायली आणि अर्जुन आता आश्रम खुनाच्या केसमध्ये महत्त्वाचे पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते एका फोन नंबरवर फोन करून खोटं नाटक रचणार आहेत. ‘आश्रमात घडलेला खून हा मधुभाऊंनी केला नसून, दुसऱ्याच कुणीतरी केला आहे आणि त्याचे सगळे पुरावे आपल्याकडे असून, ते हवे असल्यास आम्हाला एका अमुक ठिकाणी येऊन भेटावे’, असा फोन अर्जुन प्रियाला करणार आहे. मात्र, फोनच्या पलीकडे प्रिया असल्याचे अर्जुनला माहित नाही. दुसरीकडे, पुरावे कुणाला तरी सापडले आहेत या भीतीने प्रियाची बोबडी वळली आहे. हे पुरावे तर मिळवायलाच हवेत, असं म्हणत प्रिया त्या पत्त्यावर पोहोचणार आहे. तर, अर्जुन आणि सायली आधीपासूनच तिथे गुन्हेगाराला पकडण्यासाठी उभे आहेत. आता प्रिया अर्जुन आणि सायलीच्या या डावात अडकणार असून, लवकरच तिच्या गुन्ह्याचा पडदाफार्श होणार आहे.
संबंधित बातम्या