Tharala Tar Mag 3rd Jan: अर्जुनचं घर सोडून गेलेल्या सायलीला मिळेल का आई प्रतिमाची माया?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 3rd Jan: अर्जुनचं घर सोडून गेलेल्या सायलीला मिळेल का आई प्रतिमाची माया?

Tharala Tar Mag 3rd Jan: अर्जुनचं घर सोडून गेलेल्या सायलीला मिळेल का आई प्रतिमाची माया?

Published Jan 03, 2024 07:28 PM IST

Tharala Tar Mag 3rd January 2023 Serial Update: सायलीला तिच्या आईची माया मिळावी, म्हणून अर्जुन तिच्या खऱ्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे.

Tharala Tar Mag 3rd January 2023
Tharala Tar Mag 3rd January 2023

Tharala Tar Mag 3rd January 2023 Serial Update:ठरलं तर मग’ या मालिकेत आता सायली अर्जुनचं घर सोडून निघून गेली आहे. ती पुन्हा एकदा आपल्या माहेरी म्हणजेच कुसुम ताईच्या घरी येऊन राहणार आहे. मात्र, त्यावेळी कुसुम ताईच्या घरात राहत असलेल्या प्रतिमाला सगळ्यांपासून लपण्यासाठी बाहेर पडावं लागणार आहे. यावेळी पुन्हा एकदा प्रतिमा आणि सायलीची एकमेकींशी टक्कर होणार आहे. मात्र, पुन्हा एकदा त्यांची भेट होणं टळताना दिसणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून अर्जुन सायलीचा भूतकाळ शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र,त्याने याची कल्पना न दिल्यामुळे सायली त्याच्यावर चिडली आहे. यामुळे आता त्यांच्यात घरातील छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होताना दिसत आहेत. अर्जुन घरात पसारा करून ठेवत असल्यामुळे सायली त्याच्यावर चिडली होती. मात्र, यावेळी अर्जुन उलट तिच्यावरच रागावला होता. घरात शांती हवी,असं म्हणून त्याने सायलीला गप्प राहण्यास सांगितलं होतं. मात्र, अर्जुनच बोलणं सायलीच्या जिव्हारी लागलं आहे. यामुळेच आता ती घर सोडून गेली आहे. यावेळी तिची भेट पुन्हा एकदा तिच्या खऱ्या आईशी म्हणजेच प्रतिमाशी होणार आहे.

Dunki Box Office Collection: ‘डंकी’ने जगभरात गाजवलं बॉक्स ऑफिस; पार केला ४०० कोटींचा टप्पा!

सायली घाईघाईने आपल्या घराच्या दिशेने जात असताना, त्याच घरातून बाहेर पडलेली प्रतिमा तिथून निघून जाण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, वाटेतच त्यांची एकमेकींशी टक्कर होणार आहे. मात्र, पुन्हा एकदा प्रतिमा सायलीपासून आपला चेहरा लपवून तिथून निघून जाणार आहे. त्यामुळे परत एकदा दोघींची भेट थोडक्यात हुकणार आहे. सायलीला तिच्या आईची माया मिळावी, म्हणून अर्जुन तिच्या खऱ्या आई वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. सायलीने तिच्या आयुष्यात आनंदी राहावं म्हणून अर्जुन सतत प्रयत्न करत आहे.

अर्जुन सायलीच्या प्रेमात पडला आहे. तर, सायलीला मात्र अजूनही त्याच्या भावना समजलेल्या नाहीत. आपल्या मनातील प्रेम सायलीपर्यंत पोहोचवण्यासाठी अर्जुन सगळे प्रयत्न करत आहे. सायलीने देखील आपल्यावर प्रेम करावं, असं अर्जुनला मनोमन वाटत आहे. मालिकेच्या येत्या भागात हे कथानक पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner