Tharala Tar Mag: सायलीच्या प्रेमामुळे प्रतिमाला आठवणार तिला भूतकाळ? ‘ठरलं तर मग’मध्ये येणार मोठं वळण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: सायलीच्या प्रेमामुळे प्रतिमाला आठवणार तिला भूतकाळ? ‘ठरलं तर मग’मध्ये येणार मोठं वळण

Tharala Tar Mag: सायलीच्या प्रेमामुळे प्रतिमाला आठवणार तिला भूतकाळ? ‘ठरलं तर मग’मध्ये येणार मोठं वळण

Jul 31, 2024 01:04 PM IST

Tharala tar Mag 31 July 2024 Serial Update: प्रतिमा आत्या स्वतःच्या मुलीला न ओळखता सायलीजवळ कशी काय जातेय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मात्र, प्रतिमाची अवस्था बघून सगळेच तिची काळजी घेत आहेत.

Tharala tar Mag 31 July 2024 Serial Update
Tharala tar Mag 31 July 2024 Serial Update

Tharala tar Mag 31 July 2024 Serial Update:ठरलं तर मग’ या मालिकेत आता प्रेक्षकांना जबरदस्त ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. सायलीने प्रतिमा आत्याला शोधून घरी आणलं आहे. यामुळे आता सगळेच सुभेदार खूप आनंदात आहेत. मात्र, २० वर्षांपूर्वी झालेल्या अपघातात प्रतिमाला जबरदस्त मार लागल्यामुळे तिची स्मृती आणि वाचा दोन्ही गेलं आहे. यामुळेच सायलीने तिला आपल्या घरी आणलं असलं, तरी ती कुणालाच ओळखू शकत नाहीये. यामुळे आता सगळ्यांनाच तिची काळजी वाटत आहे. २० वर्षांपूर्वी झालेल्या एका गंभीर अपघातामुळे रविराज किल्लेदार यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं होतं. या अपघतात त्यांनी आपली मुलगी आणि पत्नी गमावली होती.

मात्र, त्यांची मृत शरीरं अपघाताच्या ठिकाणी न सापडल्यामुळे आजही त्यांनी आपल्या पत्नी आणि मुलीचा शोध सुरू ठेवला होता. गडगंज संपत्ती असलेल्या रविराजला अडकवून, त्याची संपत्ती हिसकावून घ्यायची असा प्लान त्याचा भाऊ नागराज याने केला होता. या प्लाननुसार नागराज याने एका आश्रमातील मुलीला तन्वी बनवून आपल्या घरी आणलं आहे. तर, दुसरीकडे त्याने एका बेवारस महिलेचा मृतदेह आणून तो प्रतिमाचा असल्याचे सगळ्यांना सांगितले आहे. त्यामुळे आता रविराजने देखील आपली पत्नी देवाघरी गेल्याचं मान्य केलं होतं. मात्र, तो या धक्क्यातून सावरत असतानाच त्याच्यासमोर प्रतिमा आल्याने आता त्याला खूप आनंद झाला आहे.

Movies in August: ‘उलझ’ ते ‘औरों में कहा दम था’; ऑगस्ट महिन्यात बॉक्स ऑफिसवर होणार धमाका!

प्रियाला बघून प्रतिमा घाबरली!

प्रतिमा देखील रविराजला बघून काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करतेय. मात्र, तिला काही केल्या भूतकाळ आठवत नाहीये. आता प्रतिमा परतून आल्यामुळे प्रिया आणि नागराज यांचा प्लान फसला आहे. त्यामुळे आता दोघेही चांगलेच भेदरून गेले आहेत. परंतु, प्रतिमाला काहीच आठवत नाहीये, हे बघून प्रियाने सुटकेचा निश्वास टाकला आहे. ती प्रतिमाला मुद्दाम स्वतःबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, तिचा स्पर्श होताच प्रतिमा घाबरून गेली आहे. तिने प्रियाचा हात सोडवून सायलीच्या दिशेने धावा घेतली आणि सायलीला मिठी मारली. हे बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटत आहे.

सायली घेणार प्रतिमाची काळजी!

प्रतिमा आत्या स्वतःच्या मुलीला न ओळखता सायलीजवळ कशी काय जातेय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मात्र, प्रतिमाची अवस्था बघून सगळेच तिची काळजी घेत आहेत. दुसरीकडे सायली प्रतिमाला खोलीत नेऊन तिला प्रेमाने जेऊ घालून झोपवण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी एक लेक आपल्या आईसाठी अंगाई गाणार आहे. हे दृश्य बघून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येणार आहे. मात्र, सायलीच्या या प्रेमळ वागण्यामुळे आता प्रतिमाला तिचे जुने दिवस आठवू लागणार आहेत.

Whats_app_banner