‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन सायलीला शोधण्यासाठी घराबाहेर पडताना दिसणार आहे सायली आपल्याजवळ हवी म्हणून मधुभाऊंची केस लांबणीवर टाकण्याचा चैतन्य आणि अर्जुनचा प्लॅन सायलीने ऐकला होता. मात्र, यामुळे तिचा मोठा गैरसमज झाला आहे. सायलीला आता असं वाटत आहे की, मधुभाऊ तुरुंगातून सुटू शकतात. मात्र, अर्जुन सरांनी त्यांना मुद्दामच तिकडे अडकवून ठेवले आहे. यामुळे चिडलेली सायली आता मधुभाऊंना भेटायला जाते, असं सांगून घरातून निघून जाणार आहे. बराच वेळ झाला तरी सायली घरी परतून आली नाही. त्यामुळे सायली कुठे गेली हे विचारण्यासाठी अर्जुन आता घरी पोहोचणार आहे.
मात्र, सायली घरात पण नाही, हे बघून त्याचं टेन्शन आणखी वाढणार आहे. अर्जुन सायलीला फोन करण्याचा प्रयत्न देखील करणार आहे. मात्र, सायली त्याचे फोन घेणार नाही. यामुळे अर्जुन आता काळजीत पडणार आहे. सायली फोनच घेत नाही, हे कळल्यानंतर आता अर्जुन तिला शोधण्यासाठी बाहेर पडणार आहे. घराजवळचे सगळे रस्ते तो धुंडाळून काढणार आहे. सायली नक्की कुठे गेली? आता ती कुठल्या अवस्थेत असेल? ती खरंच आपल्याला सोडून गेली असेल का? या प्रश्नांनी अर्जुनच्या मनात थैमान घालायला सुरुवात केली आहे. सायलीला शोधण्यासाठी आता तो वेडापिसा होणार आहे.
रस्त्यावर सायलीला शोधणाऱ्या अर्जुनला आता सायली दिसणार आहे. धावतच तिच्या मागे जाऊन अर्जुन तिला घरी चलण्याची विनंती करणार आहे. ‘मिसेस सायली, मी तुम्हाला किती वेळ फोन केला. पण, तुम्ही फोनच उचलत नाही आहात. नक्की काय झालं आहे? तुम्हाला कसला राग आलाय? आणि तुम्ही घरातून बाहेर का निघालात? आता तुम्ही घरी परतणार नाही का? माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता घरी चला. सगळेच तुमची वाट बघतायत. सगळ्यांनाच तुमची काळजी वाटतेय’, असं म्हणून काळजीच्या सुरात अर्जुन सायलीला दम देखील भरणार आहे. मात्र, सायली अर्जुनवर अजूनही चिडलेली आहे. ती अर्जुनचं काही ऐकून घेण्यास तयार नाही.
परंतु, सुभेदार कुटुंबात आपल्यामुळे गोंधळ निर्माण होईल, असा विचार करून आता सायली घरी परतणार आहे. अर्जुन सायलीला घरी घेऊन येण्यात यशस्वी तर ठरला, मात्र दोघांमधील वाद काही केल्या संपण्याचे नावच घेत नाहीये. आता सायली अर्जुनच्या खोलीतून बाहेर येऊन, खाली सोफ्यावर झोपणार आहे. याकडे आता अस्मिताचं लक्ष जाणार आहे. यानंतर घरात पुन्हा हंगामा होणार आहे.