मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  शिवानी साक्ष देणार; साक्षी अडकणार! सायली-अर्जुन केस जिंकणार? ‘ठरलं तर मग’ मालिका निर्णायक वळणावर!

शिवानी साक्ष देणार; साक्षी अडकणार! सायली-अर्जुन केस जिंकणार? ‘ठरलं तर मग’ मालिका निर्णायक वळणावर!

May 30, 2024 01:00 PM IST

चैतन्यनेच हुशारी दाखवत साक्षीच्या मोबाईलमधील सगळे पुरावे अर्जुन आणि सायलीच्या हवाली केले होते. त्यानंतर आता शिवानी देखील खरी साक्ष द्यायला कबूल झाली आहे.

शिवानी साक्ष देणार; साक्षी अडकणार! सायली-अर्जुन केस जिंकणार?
शिवानी साक्ष देणार; साक्षी अडकणार! सायली-अर्जुन केस जिंकणार?

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन, सायली यांच्यासोबत शिवानी देखील कोर्टात पोहोचणार आहे. आज मधु भाऊंच्या केसवर महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. शिवानीला कोर्टात बघून साक्षी आणि प्रिया यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. तर, अर्जुनच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागल्याने तो आणि सायली चांगलेच खुशीत आहे. चैतन्य वरकारणी साक्षीची बाजू घेण्याचा खोटा मुखवटा धारण करून कोर्टात बसला आहे. मात्र, मनातून तो अर्जुन सोबतच आहे. चैतन्यनेच हुशारी दाखवत साक्षीच्या मोबाईलमधील सगळे पुरावे अर्जुन आणि सायलीच्या हवाली केले होते. त्यानंतर आता शिवानी देखील खरी साक्ष द्यायला कबूल झाली आहे. आज कोर्टात मधु भाऊंच्या आश्रम खून प्रकरणातील अतिशय महत्त्वाचे पुरावे सादर करून मधु भाऊंना निर्दोष साध्य करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले जाणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यावेळी शिवानी सायली आणि अर्जुनवर विश्वास ठेवून सगळं सत्य कोर्टासमोर सांगणार आहे. ‘आश्रम खुनाच्या प्रकरणात आपण सुरुवातीला दिलेला मधु भाऊंच्या विरोधात दिलेला जबाब हा खोटा होता. साक्षी मॅडमच्या सांगण्यावरून मी खोटे बोलले होते आणि ते खोटे बोलण्यासाठी साक्षी मॅडमनी मला खूप पैसे दिले होते’, असं शिवानी कोर्टासमोर सांगणार आहे. त्यामुळे साक्षीनं हे सगळं मुद्दामून घडवून आणल्याचं कोर्टासमोर सिद्ध होणार आहे. शिवानीचा जवाब ऐकून साक्षीला चांगलाच हादरा बसणार आहे.

‘थलायवा’ रजनीकांत निघाले अध्यात्मिक यात्रेला! यावेळी कुठे कुठे जाणार? जाणून घ्या…

अर्जुन पुरावा सादर करणार!

दुसरीकडे, अर्जुनच्या हाती आणखी काही व्हिडीओ पुरावे देखील लागले आहेत. आता अर्जुन या केसमध्ये एक पाऊल पुढे टाकत कोर्टाला एक व्हिडीओ दाखवण्याची परवानगी मागणार आहे. कोर्टाकडून परवानगी मिळाल्यानंतर अर्जुन साक्षी आणि महिपत शिखरे यांचा एक व्हिडीओ सगळ्यांसमोर दाखवणार आहे. या व्हिडिओमध्ये महिपत साक्षीला सगळ्या प्लॅनबद्दल समजून सांगताना दिसला आहे.

कोर्ट साक्षीला शिक्षा देणार?

‘आपण कोर्टात तू आजारी असल्याचं आणि दारू प्यायली असल्याचं सांगितलं होतं. मग, हे सगळं दिसायला नको का? त्यासाठी तुला हे नाटक करावे लागेल’, असं महिपत साक्षीला म्हणताना दिसला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर आश्रमातील खून हा मधु भाऊंनी केलेला नसून साक्षीने केला आहे, हे थेट वक्तव्य अर्जुन करणार आहे. आता साक्षी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी कोणता नवा खोटा पुरावा सादर करणार की, कोर्ट साक्षीला दोषी ठरवून शिक्षा देणार आणि मधु भाऊंना या प्रकरणातून निर्दोष मुक्त करणार?, हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४