Tharala Tar Mag 30th January 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता सायली आणि अर्जुन हनिमूनसाठी रवाना झाले आहेत. माथेरानच्या थंड हवेत आता त्यांच्यातील प्रेम फुलणार आहे. अर्जुन आणि सायलीने एकमेकांना वेळ द्यावा म्हणून कल्पनाने त्यांना हनिमूनला पाठवले आहे. मात्र, आता हनिमूनच्या या प्रवासात देखील अर्जुन आणि सायलीच्या छोट्या मोठ्या कुरबुरी सुरूच राहणार आहेत. आता माथेरानला पोहोचल्यानंतर देखील सायली आणि अर्जुन यांची तूतू-मैंमै होणार आहे. तर, सायली आपली बॅग भरून निघताना दिसणार आहे. यावेळी सायली आणि अर्जुन यांना त्यांच्या वडिलांचे मित्र असणारे हॉटेलचे मालक बघणार आहेत.
सायली ही स्वभावाने अतिशय हळवी आणि साधी आहे. कल्पनाचा मान ठेवण्यासाठी सायली अर्जुनसोबत हनिमूनला आली आहे. सायली आणि अर्जुन ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, ते हॉटेल अर्जुनच्या वडिलांच्या मित्राचं आहे. त्यामुळे अर्जुन आणि सायलीला प्रत्येक पाऊल अतिशय सावकाशीने ठेवावे लागत आहे. आपलं नातं खोटं नाही हे दाखवण्यासाठी सायली आणि अर्जुन यांना विशेष मेहनत घ्यावी लागत आहे. मात्र, या सगळ्यात सायलीचा गोंधळ उडला आहे. सायली अर्जुनसोबत हॉटेल रूमवर आली आहे.
मात्र, या हॉटेल रूममध्ये असलेलं बाथरूम बघून आता सायली गोंधळून गेली आहे. कपडे बदल्य्ण्यासाठी आता गेलेली सायली रडतच बाहेर आली आहे. आता सायलीला रडत बाहेर आलेलं बघून अर्जुन गोंधळून गेला आहे. आत गेलेल्या सायलीला नेमकं काय झालं असावं, असा प्रश्न अर्जुनला पडला आहे. तो सायलीला याची विचारणा देखील करणार आहे. मात्र, सायली उत्तर न देता केवळ रडत आहे, हे बघून अर्जुन स्वतः आतमध्ये जाऊन नक्की काय झालंय हे तपासणार आहे. मात्र, अर्जुनला आता गेल्यानंतर काहीच वावगं दिसणार नाहीये. त्यामुळे तो आता आणखीनच गोंधळून जाणर आहे.
तर, दुसरीकडे सायली आपली बॅग भरून घरी जाण्याच्या तयारीत आहे. सायली अर्जुनला आपण घरी जात असल्याचे सांगताच तो आता तिला थांबण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, सायली एकही न ऐकता सरळ निघून जाणार आहे. यावेळी नेमके तिथे हॉटेलचे मालक येणार आहेत. आता त्यांना खरं कळू नये म्हणून अर्जुनला पुन्हा एकदा नाटक करावं लागणार आहे. त्याच्या या नाटकामुळे सायली मात्र थांबण्याचा निर्णय घेणार आहे.