Tharala Tar Mag: अर्जुन व्यक्त करेल का सायलीसमोर आपल्या मनातील प्रेम? 'ठरलं तर मग'मध्ये काय घडणार?-tharala tar mag 3 september 2024 serial update will arjun confess his love for sayali in hospital ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: अर्जुन व्यक्त करेल का सायलीसमोर आपल्या मनातील प्रेम? 'ठरलं तर मग'मध्ये काय घडणार?

Tharala Tar Mag: अर्जुन व्यक्त करेल का सायलीसमोर आपल्या मनातील प्रेम? 'ठरलं तर मग'मध्ये काय घडणार?

Sep 03, 2024 02:05 PM IST

Tharala Tar Mag 3 September 2024 Serial Update: आपण सायली शिवाय राहू शकत नाही, सायली आपल्या आयुष्यात नसेल तर आपलं काय होईल? या विचारांनीच अर्जुन हादरून गेला आहे.

Tharala Tar Mag: अर्जुन व्यक्त करेल का सायलीसमोर आपल्या मनातील प्रेम?
Tharala Tar Mag: अर्जुन व्यक्त करेल का सायलीसमोर आपल्या मनातील प्रेम?

Tharala Tar Mag 3 September 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन आणि सायलीमधील लुटूपुटूचं भांडण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सध्या सुभेदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. जिन्यावरून खाली घसरून पडलेली सायली काही केल्या शुद्धीवर येत नव्हती. डॉक्टरांनी देखील तिच्या मेंदूला मार लागल्याने तिच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचं सांगितलं होतं. या दरम्यान अर्जुनसह संपूर्ण सुभेदार कुटुंबच काळजीत पडलं होतं. मात्र, प्रतिमा आत्यांच्या येण्याने आता सायलीची तब्येत सुधारू लागली आहे. यामुळे आता सगळ्यांचा जीव भांड्यात पडला आहे. सायली हीच खरी तन्वी आहे याबद्दल कोणालाच माहिती नाही.

परंतु, सुभेदारांच्या घरात खोटी तन्वी म्हणून वावरत असलेल्या प्रियाला याबद्दल पूर्ण कल्पना आहे. प्रतिमा आणि सायली या मायलेकी असल्याची गोष्ट प्रियाला आधीपासूनच माहित आहे. त्यामुळेच प्रिया प्रतिमा आत्या आणि सायली या दोघींना एकमेकिंपासून वेगळं ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. दुसरीकडे, प्रिया सतत अर्जुनशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. तर, अर्जुनला देखील तिचा हा त्रास सहन करावा लागत आहे. केवळ मधुभाऊंच्या केसमधलं सत्य प्रियाला माहीत असल्याने, ते समोर येईपर्यंत आपल्याला तिच्याशी चांगलं वागावं लागेल हेच अर्जुनच्या डोक्यात आहे. त्यामुळे अर्जुन देखील प्रियाला कोणत्याही प्रकारे नकार देत नाही. याचाच जास्त फायदा आता प्रियाने उचलला आहे.

Tharala Tar Mag: सायली शुद्धीवर आली पण अर्जुन रागावला! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?

अर्जुन व्यक्त होईल का?

सायलीला त्रास देण्यासाठी तिने अर्जुनला जवळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सायलीने तिला रोखण्याचा प्रयत्न केला असता प्रियाने सायलीलाच जिन्यावरून ढकलून दिलं होतं. याच अपघातात सायलीच्या मेंदूला मार लागल्यामुळे ती बेशुद्ध झाली होती. सायलीला हॉस्पिटलमध्ये पाहून अर्जुनच्या जीवाचं पाणी पाणी झालं होतं. आपण सायली शिवाय राहू शकत नाही, सायली आपल्या आयुष्यात नसेल तर आपलं काय होईल? या विचारांनीच अर्जुन हादरून गेला होता. सायली शुद्धीवर आल्यावर लटक्या रागात अर्जुनने तिला आपल्या मनातील भावना बोलून दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने स्वतःला वेळीच रोखले आणि आपल्या मनातील भावना सायलीला कळू दिल्या नाहीत.

सायलीला मनातील कळेल का?

दुसरीकडे, सायली अर्जुन आता तरी काही बोलेल का? त्याच्या मनात आपल्याविषयी काही प्रेम आहे का? याच विचारात अडकून पडली आहे. दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत असले तरी दोघांनाही याबद्दल माहिती नाही. त्यामुळे आता या आजारपणाच्या निमित्ताने तरी अर्जुन सायलीला आपल्या मनातील सगळ्या गोष्टी स्पष्टपणे सांगू शकेल का?, हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.