Tharala Tar Mag 3 October 2024 Serial Update: मराठी टीव्ही मालिकांमध्ये ‘ठरलं तर मग’ ने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता मालिकेतील एका महत्त्वाच्या वळणामुळे प्रेक्षकांना नवा थ्रिल अनुभवायला मिळणार आहे. अर्जुन, जो नेहमीच सायलीवरील आपल्या प्रेमाला लपवत आला, त्याने अखेर तिच्यावर असलेल्या प्रेमाची कबुली देण्याचे ठरवली आहे. अर्जुनच्या जीवनात सायलीसाठी असलेलं प्रेम नेहमीच एक गूढ रहस्य राहिलं आहे. विशेषतः मधुभाऊंच्या केसमध्ये प्रेमात न पडण्याची अट असल्यामुळे त्याने सायलीपासून आपले प्रेम लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रियाचा अतिरेक पाहिल्यावर, अर्जुन तिच्यासमोर आपल्या मनातील भावना स्पष्ट करणार आहे.
अर्जुनने प्रियाकडून सत्य काढून घेण्यासाठी तिच्याशी मैत्री करण्याचे नाटक सुरू केले होते. पण, प्रिया या सर्व गोष्टींना त्याचे प्रेम समजून बसली. मात्र, अर्जुनने प्रियाच्या पायावर जन्म खुण नसल्याचे तपासून पाहिल्यानंतर, त्याला लक्षात आलं की प्रिया खोटी तन्वी आहे. त्यामुळे त्याने प्रियाच्या खऱ्या चेहर्याला उघड करण्यासाठी नवा प्लॅन तयार केला आहे. तो आता प्रियाचा खोटेपणा उघड करणार आहे.
घरात कुणी नसल्याचा फायदा घेत प्रिया अर्जुनसाठी डिनर डेट प्लॅन करणार आहे. अर्जुनही आपल्या प्रेमात आहे, असं समजून, ती लाल बदामाच्या आकाराचे फुगे, मेणबत्त्या आणि सजवलेलं टेबल ठेवून वातावरण रोमँटिक करणार आहे. पण, अर्जुन या सर्व प्लॅनपासून अनभिज्ञ असून, त्याच्या कामात व्यस्त आहे. आता खोलीबाहेर आलेल्या अर्जुनला प्रियाचा हा प्लॅन कळणार आहे आणि त्यामुळे आता तो संतापणार आहे. यावेळी प्रिया त्याच्या अधिक जवळ जात, त्याला कीस करण्याचा प्रयत्न करणार आहे.
प्रियाच्या रोमँटिक प्रयत्नांमुळे अर्जुन चिडणार असून, तिला ढकलून देणार आहे. यावेळी तो तिला स्पष्ट सांगणार आहे की, ‘माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाही. मी या जगात फक्त एका व्यक्तीवर प्रेम करतो, ती म्हणजे माझी बायको सायली.’ या वादाच्या दरम्यान, सायली अचानक तिथे येणार असून, अर्जुनचे शब्द तिच्या कानावर पडणार आहेत. अर्जुनच्या मनातील प्रेमाच्या कबुलीने सायलीला आनंदी करून टाकणार आहे. हे ऐकून सायलीच्या चेहऱ्यावर हास्य फुलणार आहे आणि तिच्या मनात अर्जुनप्रती असलेले प्रेम अधिक गडद होणार आहे.
अर्जुन आणि प्रियाच्या या संघर्षाने आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. सायलीला अर्जुनच्या प्रेमाची कबुली मिळाल्यावर त्यांची प्रेमकथा कशी पुढे जाईल, हे पाहणे रोमांचक ठरेल. या सर्व घटनाक्रमामुळे 'ठरलं तर मग' च्या आगामी भागांमध्ये नवी वळणं येणार असल्याने प्रेक्षकांना मोठ्या उत्सुकतेने या मालिकेचा पुढील भाग बघण्याची आतुरता आहे.