Tharala Tar Mag 3 February 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या प्रेमाचा मोसम पाहायला मिळत आहे. सायली आणि अर्जुन त्यांच्या आयुष्यातील खास क्षण एन्जॉय करत आहेत. तर, सायली आणि अर्जुन पाठोपाठ आता प्रिया देखील माथेरानला पोहोचली आहे. तर, सायली आणि अर्जुन यांना एकत्र बघून आता प्रियाचा जळफळाट होत आहे. ती सायलीला त्रास देण्यासाठी आता नवे डाव आखणार आहे. सायलीला त्रास व्हावा, तिचा जीव धोक्यात यावा म्हणून प्रिया प्रयत्न करत आहे. तर, दुसरीकडे अर्जुन मात्र सावलीप्रमाणे सायलीची काळजी घेत आहे.
सायली तिच्या आजवरच्या आयुष्यात पहिल्यांदाच इतक्या दूर फिरण्यासाठी आली आहे. माथेरानचं निसर्गसौंदर्य बघताना सायली त्यात हरवून गेली आहे. तर, सायलीला आनंदात पाहून अर्जुन देखील हरखून गेला आहे. सायलीची प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हाव्हीत यासाठी अर्जुन प्रयत्न करत आहे. सायलीला माथेरान सफर घडवण्यापासून ते तिच्यासोबत खास फोटो काढण्यापर्यंत सगळ्या गोष्टी अर्जुन करत आहे. मात्र, अर्जुनचं असं टिपिकल नवऱ्यासारखं वागण बघून कुठेतरी सायलीची चिडचिड देखील होत आहे. मात्र, आता ती त्याला सरळ याबद्दल सांगणार आहे की, मला असे रोमँटिक फोटो काढायचे नाहीत. तर, अर्जुन देखील तिच्या विनंतीचा मान ठेवणार आहे.
आता सायलीला माथेरानच्या प्रसिद्ध शिव मंदिरात जायचं आहे. मात्र, त्या आधी आपण फिरून येऊ असा अर्जुनचा हट्ट आहे. इतक्यात त्यांना आईचा म्हणजेच कल्पनाचा फोन येणार आहे. तर, सायली कल्पनाकडे अर्जुनची तक्रार करणार आहे. अर्जुन आपल्याला मंदिरात घेऊन जात नाहीये, असं सायली त्यांना सांगणार आहे. तेव्हा कल्पना अर्जुनला दटावून तिला मंदिरात घेऊन जायला सांगणार आहे. ‘तुम्हा दोघांचा संसार सुखाचा होवो आणि मी लवकर आजी होवो’, असं कल्पना त्यांना म्हणणार आहे. मात्र, हे ऐकून पूर्णा आजीला राग येणार आहे. सुभेदारांची सून म्हणून पूर्णा आजीला सायली पसंत नाही.
दुसरीकडे, अर्जुन आता सायलीला घेऊन शिव मंदिरात जाणार आहे. मात्र, त्या आधी तलावाकाठी पोहोचलेल्या सायलीला पाण्यात पडण्यापासून पुन्हा एकदा अर्जुन वाचवणार आहे. सायलीला वाचवण्यासाठी अर्जुन तिला आपल्या जवळ ओढणार आहे. तर, सायलीला अर्जुनच्या इतक्या जवळ पाहून आता प्रियाच्या रागाचा पारा आणखी वाढणार आहे. मालिकेच्या येत्या भागात हे कथानक पाहायला मिळणार आहे.