मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सुभेदारांचं घर लाल रंगात न्हाऊन निघालं! नेमकं कारण काय? ‘ठरलं तर मग’मध्ये नवा ट्वीस्ट

सुभेदारांचं घर लाल रंगात न्हाऊन निघालं! नेमकं कारण काय? ‘ठरलं तर मग’मध्ये नवा ट्वीस्ट

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 03, 2024 01:23 PM IST

बेडरूममध्ये लाल फुलांचं डेकोरेशन, लाल मेणबत्ती, लाल पडदे, लाल फुलदाणी बेडरूममध्ये आजूबाजूला सगळं लाल-लाल पाहून अर्जुन खूश झाला आहे.

सुभेदारांचं घर लाल रंगात न्हाऊन निघालं! नेमकं कारण काय? ‘ठरलं तर मग’मध्ये नवा ट्वीस्ट
सुभेदारांचं घर लाल रंगात न्हाऊन निघालं! नेमकं कारण काय? ‘ठरलं तर मग’मध्ये नवा ट्वीस्ट

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना एक गोड सरप्राईज मिळणार आहे. सुभेदारांचे घर आज पूर्ण लाल रंगात न्हाऊन निघाले आहे. अर्जुन सकाळी उठल्यानंतर, त्याला बेडरुममध्ये आजूबाजूला सगळीकडेच लाल रंग दिसणार आहे. बेडरूममध्ये लाल फुलांचं डेकोरेशन, लाल मेणबत्ती, लाल पडदे, लाल फुलदाणी बेडरूममध्ये आजूबाजूला सगळं लाल-लाल पाहून अर्जुन खूश झाला आहे. सायली रुममध्ये आल्यावर अर्जुन तिला याबद्दल विचारणार आहे. आज सगळं काही लाल रंगात दिसण्यामागचं कारण तरी काय?, असा प्रश्न अर्जुन सायलीला विचारणार आहे. त्यावर सायली त्याला म्हणणार आहे की, तुम्ही खाली तर चला, तिकडे तुमच्यासाठी आणखी एक सरप्राईज आहे.

आता अर्जुन खाली टेबलवर नाश्त्यासाठी पोहोचल्यावर त्याला आणखी एक छान सरप्राईज मिळणार आहे. आता हे सरप्राईज म्हणजे आणखी काही लालचटक गोष्टी असणार आहेत. खास अर्जुनसाठी आज नाश्त्यात बीटाचे डोसे आणि टोमॅटोची लाल चटणी आणि सोबत कलिंगडाचा ज्यूस असणार आहे. नाश्त्यातही सगळीकडे लाल-लाल रंग पाहून, आता अर्जुन गोंधळून गेला आहे. अर्जुनच नाही, तर सुभेदारांच्या घरातील सगळे सदस्य लाल रंगामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यावेळी अश्विन सायलीला याबद्दल प्रश्न विचारणार आहे.

मराठी रंगभूमीवर होणार आगळावेगळा प्रयोग; पहिलं AI महाबालनाट्य ‘आज्जीबाई जोरात’ची घोषणा!

सुभेदारांना पडलाय प्रश्न

‘सायली वहिनी आज सगळं लाल रंगाचं खाणं, लाल रंगात रंगण्याचा नेमकं कारण तरी काय?’, असा प्रश्न अश्विन सायली विचारतो. सायलीला प्रश्न विचारल्यावर कल्पना कोपरखळी मारत उत्तर देणार आहे. ‘कुणालातरी घरात लाल रंग फारच आवडतो, म्हणून आज सायलीने कष्ट घेतले आहेत’, असं कल्पना म्हणणार आहे. आता हा लाल रंग नेमका कुणाला आवडतो? अर्जुनला की सायलीला? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र, या निमित्ताने सायली आणि अर्जुनमध्ये जवळीक वाढताना दिसत आहे. लवकरच दोघेही आपल्या मनातील प्रेम एकमेकांकडे व्यक्त करण्याची शक्यता आहे.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’; ‘चला हवा येऊ द्या’ बंद झाल्यानंतर निलेश साबळेची ‘या’ वाहिनीवर एन्ट्री

नुकतंच मालिकेत सायलीने प्रियाला खडसावत अर्जुन आपला नवरा असल्याचं म्हटलं आहे. ‘माझ्या नवऱ्यावर पहिला अधिकार हा केवळ माझा आहे. मी त्याची पत्नी आहे’, असं सायलीने प्रियाला ठणकावून सांगितलं आहे. तर, पूर्णा आजीला देखील तिने चोख उत्तर देऊन आजीचं तोंड बंद केलं आहे. सतत सायलीला टोमणे मारून बोलणारी आजी आता सायलीचे हे रूप पाहून शांत झाली आहे.

IPL_Entry_Point

विभाग