मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 2nd Dec: सायली सोडून जाणार अर्जुनचं घर? 'ठरलं तर मग' रंजक वळणावर!

Tharala Tar Mag 2nd Dec: सायली सोडून जाणार अर्जुनचं घर? 'ठरलं तर मग' रंजक वळणावर!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Jan 02, 2024 01:07 PM IST

Tharala Tar Mag 2nd December 2024 Serial Update: अर्जुन सायलीचा भूतकाळ शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्याने याची कल्पना न दिल्यामुळे सायली त्याच्यावर रागावली आहे.

Tharala Tar Mag 2nd December 2024
Tharala Tar Mag 2nd December 2024

Tharala Tar Mag 2nd December 2024 Serial Update: 'ठरलं तर मग' या मालिकेत नुकतंच सायली आणि अर्जुन यांच्यात लुटूपुटूचं भांडण झालेलं पाहायला मिळालं आहे. मात्र, आता त्यांच्यातील हे भांडण टोकाला जाताना पाहायला मिळणार आहे. अर्जुन सायलीचा भूतकाळ शोधून काढण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्याने याची कल्पना न दिल्यामुळे सायली त्याच्यावर रागावली आहे. आता त्यांच्यात घरातील छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होताना दिसणार आहेत. अर्जुन घरात पसारा करून ठेवत असल्यामुळे सायली त्याला सतत बडबड करणार आहे. मात्र, यावेळी अर्जुन उलट तिच्यावरच रागवणार आहे. घरात शांती हवी, असं म्हणून त्याने सायलीला गप्प राहण्यास सांगितलं होतं.

अर्जुन उलट आपल्यावरच रागावला आहे, असं वाटून सायलीने देखील आता त्याच्याशी अबोला धरला आहे. मात्र, आपल्याला राग आला आहे हे अर्जुनला कळावं म्हणून सायली घरातील प्रत्येक वस्तू आपटून ठेवण्याचा प्रयत्न करत होती. यावर देखील अर्जुनने तिला काही बोल सुनावले. यानंतर आता सायली आणखीच चिडली आहे. सायलीचे समजूत न काढताच अर्जुन ऑफिसला निघून जाणार आहे. मात्र, घरी आल्यावर आता अर्जुनलाच मोठा धक्का बसणार आहे. घरात आल्यावरच अर्जुनला शांतता जाणवल्याने तो धावत आल्या रूमकडे जाणार आहे. यावेळी सायली तिथे न दिसल्याने तो अस्वस्थ होणार आहे.

Kshitee Jog: करण जोहरने मागितली क्षिती जोगची माफी! कारण ऐकलंत का?

केवळ घरातच नाही तर, रूममध्ये देखील सायलीचा सामान दिसत नसल्याने आता अर्जुन अस्वस्थ होणार आहे. तर, घरात तो सगळ्यांकडेच सायलीची विचारणा करणार आहे. तर, त्यावेळी अर्जुनाची आई त्याला सायली घर सोडून गेल्याचे सांगणार आहे. सायली घर सोडून कुसुम ताईंकडे राहायला गेली, असं आई अर्जुनला सांगणार आहे. तर, सायली घर सोडून निघून गेली यावर अर्जुनचा विश्वास बसत नाहीये. एकीकडे सायली घरात दिसत नसली तरी, ती घर सोडून गेली आहे का? हे आधी अर्जुन तपासून बघणार आहे.

आता सायली खरंच घर सोडून निघून गेली असेल, तर अर्जुन तिची समजूत काढू शकेल का? सायलीचा राग दूर होईल का? हे आता मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

WhatsApp channel