Tharala Tar Mag: पूर्णा आजी पुन्हा एकदा प्रियाला सुनावणार! सायली प्रतिमा आत्याची मदत करू शकणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: पूर्णा आजी पुन्हा एकदा प्रियाला सुनावणार! सायली प्रतिमा आत्याची मदत करू शकणार?

Tharala Tar Mag: पूर्णा आजी पुन्हा एकदा प्रियाला सुनावणार! सायली प्रतिमा आत्याची मदत करू शकणार?

Published Jul 29, 2024 01:01 PM IST

Tharala Tar Mag 29 July 2024 Serial Update: प्रतिमाला घरी आलेलं पाहून सगळेच खूप खुश झाले आहेत. मात्र, प्रतिमा कुणालाच ओळखत नसल्याने सगळेच गोंधळून गेले आहेत.

Tharala Tar Mag 29 July 2024 Serial Update
Tharala Tar Mag 29 July 2024 Serial Update

Tharala Tar Mag 29 July 2024 Serial Update:ठरलं तर मग’ या मालिकेत आता धमाकेदार कथानक पाहायला मिळणार आहे. सायली आता प्रतिमा आत्याला घरी घेऊन आली आहे. तर, प्रतिमा आत्याला बघून आता घरात सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे. आता पूर्णा आजी खूप खुश झाली आहे. मात्र, प्रतिमाला काहीच आठवत नसल्याने तिच्यासाठी हे सगळंच नवीन आहे. तिच्यासाठी ही माणसं, सुभेदारांचं घर सगळं काही वेगळं आहे. मात्र, आता सायली प्रतिमाला तिची जागा पुन्हा मिळवून देणार आहे. यात संपूर्ण सुभेदार कुटुंब तिला मदत करणार आहे. यामुळे आता प्रियाचं पितळ देखील लवकरच उघडं पडणार आहे.

प्रतिमाला घरी आलेलं पाहून सगळेच खूप खुश झाले आहेत. मात्र, प्रतिमा कुणालाच ओळखत नसल्याने सगळेच गोंधळून गेले आहेत. पूर्णा आजीने रविराजला देखील बोलवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रतिमा किमान रविराजला तरी ओळखेल, असं पूर्ण आजीला वाटत आहे. त्यामुळेच पूर्णा आजी तातडीने रविराजला घरी बोलवून घेणार आहे. तर, रविराजसोबत खोटी तन्वी म्हणजेच प्रिया देखील सुभेदारांच्या घरात येणार आहे. प्रिया सुभेदारांच्या घरात शिरकाव करण्यासाठी सतत काहीना काही तरी बहाणे शोधत असते. आता प्रतिमाच्या येण्याने प्रियाला सुभेदारांच्या घरात शिरण्याचं एक नवं कारणच मिळालं आहे. त्यामुळे रविराज पाठोपाठ प्रिया देखील सुभेदारांच्या घरात शिरकाव करणार आहे.

सायली प्रतिमाला धीर देणार!

प्रतिमाला सगळ्यांसमोर अवघडल्यासारखं वाटत असल्यानं सायली तिला आपल्या खोलीत घेऊन गेली आहे. सायली प्रतिमाला सांगते की, ‘आता तुम्ही तुमच्या माणसांमध्ये आला आहात. ही माणसं तुम्हाला खूप प्रेम देतील. तुम्ही या सगळ्यांसोबत खूप खुश राहाल. मला माहिती आहे तुमच्यासाठी हे खूपच वेगळं आहे. पण, तुम्ही या सगळ्यांसोबत आनंदात राहाल याची मी खात्री देते.’ सायलीचे हे बोलणं ऐकून प्रतिमाला देखील हायसं वाटू लागतं. एकीकडे सायली प्रतिमाला हे समजवत असताना, दुसरीकडे प्रिया मात्र पूर्णा आजीचे कान भरण्याची संधी सोडत नाही.

Who Is Irina Rudakova: ‘बिग बॉस मराठी ५’च्या घरात एन्ट्री करणारी विदेशी बाला इरिना रुडाकोवा आहे तरी कोण?

प्रिया पूर्ण आजीला म्हणते की, ‘माझी आई या जगात नाही. या सायलीचा काहीतरी गैरसमज होतोय आणि ती मला त्रास देण्यासाठी हे सगळं मुद्दाम करतेय.’ मात्र, पूर्णा आई तिचं बोलणं ऐकत नाही, त्यावेळी प्रिया रविराजला बोलते की, ‘बाबा तुम्ही तरी आजीला सांगा की, आई या जगात नाही. सायलीचा काहीतरी गैरसमज होतो आहे.’ यावर आता पूर्णा आजी आता चिडून म्हणणार आहे की, ‘हो गैरसमजच होतोय. पण हा गैरसमज सायलीकडून नाही तर, प्रिया तुझ्याकडून होतो.’ आता पुन्हा एकदा पूर्णा आजी प्रियावर बरसणार आहे.

Whats_app_banner