Tharala Tar Mag 29th Feb: सुभेदारांच्या घरात येणार नवं वादळ; महिपत शिखरे रचणार नवा डाव! पुढे काय होणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 29th Feb: सुभेदारांच्या घरात येणार नवं वादळ; महिपत शिखरे रचणार नवा डाव! पुढे काय होणार?

Tharala Tar Mag 29th Feb: सुभेदारांच्या घरात येणार नवं वादळ; महिपत शिखरे रचणार नवा डाव! पुढे काय होणार?

Feb 29, 2024 05:11 PM IST

Tharala Tar Mag 29 February 2024 Serial Update: अर्जुनच्या वडिलांच्या गाडीत ड्रग्ज ठेवण्याचा सगळा प्लॅन महिपत आणि नागराज शिखरे यांनी केला आहे.

Tharala Tar Mag 29 February 2024
Tharala Tar Mag 29 February 2024

Tharala Tar Mag 29 February 2024 Serial Update: सायली आणि अर्जुन यांच्या प्रेमाच्या मार्गात सतत काहीना काही अडथळे येत आहेत. एकीकडे अर्जुन सायलीच्या प्रेमात आकंठ बुडत चालला आहे. तर, दुसरीकडे आता सायलीने देखील त्याच्या दिशेने मैत्रीचा हात पुढे केला आहे. आता आपण सायलीला आपल्या मनातील भावना सांगून टाकू, असं अर्जुनने ठरवलंच होतं की, आता आणखी एक नवं संकट त्यांच्या पुढ्यात येऊन उभं राहिलं आहे. आता सुभेदारांच्या घरात मोठा हंगामा होणार आहे. मात्र, यावेळी कारण सायली नाही तर, अर्जुनचे वडील अनंत सुभेदार असणार आहे.

सायली आणि अर्जुन आश्रमातून नुकतेच घरी परतले आहे. चैतन्यमुळे अस्वस्थ असलेल्या अर्जुनची समजूत काढण्यात सायली यशस्वी ठरली आहे. ती अर्जुनला शांत करून पुन्हा घरी घेऊन आली आहे. आपण एकदा चैतन्यशी शांतपणे बोलून बघू, असे तिने अर्जुनला म्हटले आहे. सायलीचं म्हणण पटल्याने आता अर्जुन देखील शांत डोक्याने घरी परतला आहे. आता तो सायलीला प्रपोज करण्याची तयारी करणार आहे. तर, दुसरीकडे, अस्मिता पुन्हा पूर्णा आजीचे कान भरण्याचा प्रयत्न करणार आहे. सायली घरात आल्यामुळेच आपल्या घराला नजर लागली आणि तिच्यामुळे घरात कोर्ट कचेरीची प्रकरणं होऊ लागली, अस बोलून अस्मिता पूर्णा आजीचं मन कलुषित करणार आहे.

Terav: संकटांना न घाबरता लढणाऱ्या शेतकरी महिलेची कथा! 'तेरवं' चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?

तर, अस्मिताचं बोलणं ऐकून आता कल्पना तिच्यावर चिडणार आहे. दुसरीकडे स्वतःच्या खोलीत प्रपोज करण्याची तयारी करत असलेला अर्जुनला सायलीच्या आवाजामुळे खाली जावं लागणार आहे. सुभेदारांच्या घरात आता पोलीस आलेत. पोलीस अनंत सुभेदारांना अटक करून घेऊन जाणार आहे. ड्रग्जची ने-आण करण्याच्या आरोपाखाली पोलीस अर्जुनच्या वडिलांना अटक करणार आहेत. मात्र, त्यांच्या औषधांच्या गाडीमध्ये ड्रग्ज नेमके कसे आले, याची कुणालाच कल्पना नाही. पोलिसांकडे अटकेचं वॉरंट असल्याने आता अर्जुन देखील त्यांना रोखू शकणार नाहीये.

अर्जुनच्या वडिलांच्या गाडीत ड्रग्ज ठेवण्याचा सगळा प्लॅन महिपत आणि नागराज शिखरे यांनी केला आहे. दोघांनी एका व्यक्ती करवी ड्रग्जच्या पुड्या मागवून त्या गाडीत ठेवल्या आहेत. यानंतर अर्जुनच्या वडिलांना यात अडकवण्यासाठी महिपत स्वतः पोलिसांना फोन करून याची माहिती देणार आहे. अर्जुनच्या वडिलांच्या कंपनीच्या गाडीत ड्रग्ज असल्याची माहिती देऊन, महिपत स्वतःची ओळख लपवण्यासाठी सीम कार्ड देखील फेकून देणार आहे. या तक्रारीनंतरच पोलीस अर्जुनच्या वडिलांना पकडून नेणार आहेत.

Whats_app_banner