मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  चैतन्य-अर्जुन आणि सायलीचं ’ठरलं तर मग’; साक्षीच्या नाटकाचा मिळून शेवट करणार! मालिकेत येणार रंजक वळण

चैतन्य-अर्जुन आणि सायलीचं ’ठरलं तर मग’; साक्षीच्या नाटकाचा मिळून शेवट करणार! मालिकेत येणार रंजक वळण

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 29, 2024 03:20 PM IST

साखरपुडा सोहळा सुरू असताना, आता अर्जुन आणि सायली चैतन्यला एकट्यात गाठून सगळं सत्य पुराव्यानिशी त्याच्या समोर मांडणार आहेत.

चैतन्य-अर्जुन आणि सायलीचं ’ठरलं तर मग’; साक्षीच्या नाटकाचा मिळून शेवट करणार! मालिकेत येणार रंजक वळण
चैतन्य-अर्जुन आणि सायलीचं ’ठरलं तर मग’; साक्षीच्या नाटकाचा मिळून शेवट करणार! मालिकेत येणार रंजक वळण

ठरलं तर मग’ या मालिकेत आता एक मोठं रंजक वळण येताना दिसणार आहे. चैतन्यने साक्षीसोबत साखरपुडा करत असल्याचा जाहीर करून सगळ्यांनाच मोठा धक्का दिला होता. तर, ‘कुणालचा मृत्यू हा साक्षीमुळे झालाय. साक्षी आता तुझाही जीव घेऊ शकते, त्यामुळे तू साक्षीपासून वेगळा हो’, असं अर्जुन म्हणत असून देखील चैतन्यने त्याचं बोलणं ऐकलेलं नाही. तर, आपल्या मित्राला आता या साक्षीच्या तावडीतून सोडवायचंच, हा विचार करून अर्जुन आणि सायली आता एक नवा प्लॅन आखणार आहेत. नुकताच साक्षीला घेऊन चैतन्य सुभेदारांच्या घरी पोहोचला होता. यावेळी त्यांनी सगळ्या सुभेदारांना आपल्या साखरपुड्याचं आमंत्रण दिलं.

ट्रेंडिंग न्यूज

‘तुम्ही माझं कुटुंब आहात आणि तुमच्या शिवाय मी माझ्या आयुष्यातला कुठलाच प्रवास सुरू करू शकत नाही. त्यामुळे माझ्या आयुष्यातल्या एका नव्या प्रवासासाठी शुभेच्छा द्यायला तुम्ही नक्की याल’, असं म्हणत चैतन्य आणि साक्षीनं त्यांच्या साखरपुड्याचं आमंत्रण सुभेदार कुटुंबाला दिलं होतं. आता या मालिकेत चैतन्य आणि साक्षी यांचा साखरपुडा पार पडताना पाहायला मिळणार आहे. साखरपुड्याच्या वेळी चैतन्य हा सतत सुभेदार कुटुंबाची वाट बघत असताना दिसणार आहे. मात्र, सगळी तयारी होऊन, गुरुजी बोलवत असताना देखील सुभेदार कुटुंबातून कोणीच न आल्यानं चैतन्यची निराशा झाली होती.

मराठी अभिनेत्रीला मेसेज करत सेक्सची मागणी; गायत्री दाताराने थेट स्क्रीनशॉटच शेअर केला! म्हणाली...

चैतन्य खुश तर साक्षीला बसणार शॉक!

एकीकडे साखरपुड्यासाठी तयार होऊन बसलेला चैतन्यच्या नजरा मात्र दरवाजाकडेच लागल्या होत्या. गुरुजींनी बोलवल्यानंतर आता साखरपुड्याच्या ठिकाणी जात असताना, सुभेदार कुटुंब येऊन चैतन्याला सुखद धक्का देणार आहे. तर, आपल्या कुटुंबाला तिथे आलेलं पाहून चैतन्याच्या आनंदाला देखील पारावार उरणार नाहीये. मात्र, सुभेदार कुटुंबाला दारात पाहून आता साक्षीच्या पायाखालची जमीन सरकली आहे. आनंदीत झालेला चैतन्य साक्षीला म्हणतो की, ‘बघ साक्षी आपल्या साखरपुड्याला माझं संपूर्ण कुटुंब हजर राहणार आहे.’ मात्र, साक्षीच्या चेहऱ्यावर बारा वाजणार आहेत. एक धक्का बसतो नाही तोवर मागून अर्जुन आणि सायली येऊन देखील साक्षीला जोरदार शॉक देणार आहेत.

अखेर चैतन्यला सत्य कळणार!

तर, अर्जुन आणि सायलीला आपल्या साखरपुड्यात आलेलं पाहून चैतन्य खुशमखुश होणार आहे. एकीकडे सोहळा सुरू असताना, आता अर्जुन आणि सायली चैतन्यला एकट्यात गाठून सगळं सत्य पुराव्यानिशी त्याच्या समोर मांडणार आहे. तर, समोर आलेलं हे धक्कादायक सत्य पाहून चैतन्य देखील हादरून जाणार आहे. चैतन्य साक्षीसोबत हा साखरपुडा मोडायला निघणार इतक्यातच अर्जुन आणि सायली त्याला थांबवून साक्षीचा संपूर्ण खेळ समजवणार आहेत. हा खेळ सुरू साक्षीने केला होता, मात्र याचा शेवट आपण तिघं मिळून करणार असा निर्धार सायली, अर्जुन आणि चैतन्य यांनी केला आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये या तिघांचा पुढचा डाव प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point