Tharala Tar Mag 28th December 2023 Serial Update: 'ठरलं तर मग' या मालिकेच्या कथानकात आता मोठा ट्विस्ट येणार आहे. सायली आणि अर्जुन यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होणार आहे. पुरावे शोधण्यासाठी चोरून आश्रमात गेलेले सायली-अर्जुन आता पोलिसांच्या तावडीत सापडणार आहेत. सील करण्यात आलेल्या आश्रमात कुणीतरी चोरून शिरल्याची माहिती पोलिसांना मिळणार आहे. त्यामुळे पोलीस देखील आश्रमाची झडती घेण्यासाठी तिथे पोहोचणार आहेत. यावेळी अर्जुन आणि सायली अडचणीत सापडणार आहेत.
आश्रमात घडलेल्या विलासच्या खुनाच्या घटनेमुळे मधुभाऊ गोत्यात आले आहेत. विलासच्या खुनाचा खोटा आरोप मधुभाऊंवर लावण्यात आला आहे. याच खुनाच्या आरोपातून मधुभाऊंना सोडवण्यासाठी सायली आणि अर्जुन आपले प्रयत्न पणाला लावत आहेत. आश्रमात या केस संबंधित काहीतरी पुरावा नक्कीच सापडेल, या विचारांनी त्यांनी आश्रम गाठलं आहे. विलासच्या खुनानंतर पोलिसांनी या आश्रमाला टाळा लावला आहे. कुणीही पोलिसांच्या परवानगीशिवाय या आश्रमात जाऊ नये, असा आदेश देखील तिथे लावण्यात आला आहे. मात्र, तरी सायली आणि अर्जुन कुणाचीही परवानगी न घेता आश्रमात शिरणार आहेत.
आश्रमात शिरलेल्या सायली आणि अर्जुनला तिथे कोणताही पुरावा सापडणार नाहीये. मात्र, त्यावेळीच पोलिसांची तिथे एंट्री होणार आहे. पोलिसांना अचानक तिथे बघून सायली आणि अर्जुन भांबावून जाणार आहेत. आता सायली आणि अर्जुन पोलिसांपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गवताच्या एका पेंढ्यामागे लपणार आहेत. मात्र, गवताच्या पेंढ्यामागे कुणीतरी असल्याचा संशय पोलिसांना आल्याने ते काठीने पेंढ्यावर जोरदार प्रहार करणार आहेत. यावेळी पोलिसांच्या काठीच्या मार सायलीला लागू नये म्हणून अर्जुन तिला बाजूला खेचून स्वतः तो मार झेलणार आहे.
पोलिसांच्या काठीचा मार अर्जुनला लागलेला पाहून सायलीला रडू कोसळणार आहे. या दरम्यान दोघांमध्ये हळूहळू प्रेम फुलताना दिसणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हा थरार पाहायला मिळणार आहे.