Tharala Tar Mag 28 September 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. एकीकडे सायली आणि अर्जुन एकमेकांचे मित्र बनून जवळ येताच होते की, आता त्यांच्यात दुरावा निर्माण होणार आहे. त्यांच्यातील हा दुरावा आता त्यांचं नातं मोडण्यापर्यंत पोहोचणार आहे. चैतन्यच्या एक आयडियामुळे आता सायली आणि अर्जुन यांच्या नात्यात मोठी दरी पडणार आहे. यामुळे आता सुभेदारांच्या घरात मोठा गोंधळ उडणार आहे. तर, अर्जुनच्या आयुष्यात देखील मोठा भूकंप येणार आहे.
अर्जुन सायलीच्या प्रेमात आकंठ बुडला आहे. तर, दुसरीकडे सायली देखील त्याच्या प्रेमात पडली आहे. मात्र, दोघांनीही आपल्या प्रेमाची कल्पना एकमेकांना दिलेली नाही. त्यामुळे दोघांनाही याची कल्पना नाही. अर्जुन आपल्या मनातील भावना चैतन्यला सांगतो, तर सायली आपल्या भावना कुसुम ताईला सांगते. मात्र, कुसुम ताई सायलीलाच समजावते की, मनात इमला बांधण्याआधी अर्जुनला या गोष्टी विचारून घे. तर, यामुळे सायलीच्या मनात देखील थोडी शंका येते. यानंतर ती अर्जुनला विचारण्याचा निर्णय घेते. मात्र, त्याला कसं विचारू या विचारत ती असते. तर, अर्जुन तिचं बोलणं अर्धवट ऐकून गैरसमज करून घेतो. मात्र, यानंतर तो हे सगळं चैतन्यला जाऊन सांगतो.
आपला जिवाभावाचा मित्र असा खचत चाललाय हे बघून चैतन्यच्या डोक्यात एक आयडिया येते. तो अर्जुनला सांगतो की, ‘आपण मधुभाऊंना सोडवणार आहोतच, पण सध्या त्यांची केस काही काळ लांबणीवर टाकूया. म्हणजे ते जितका वेळ तुरुंगात राहतील, तितका वेळ सायली वहिनी तुझ्याजवळ राहील.’ सुरुवातीला अर्जुनला ही कल्पना पटत नाही. तो चैतन्यला नकार देतो. मात्र, सायलीच्या दुराव्यापेक्षा हा पर्याय त्याला पसंत पडतो आणि तो यासाठी तयार होतो. परंतु, अजूनही त्याच्या मनात किंतु आहे. हे सगळं बोलणं सुरू असताना सायलीच्या कानावर पडणार आहे. अर्जुन मुद्दामहून मधुभाऊंची केस पुढे ढकलत आहे, हे कळल्यावर आता तिला मोठा धक्का बसणार आहे. यामुळे सायली अर्जुनवर चिडणार आहे.
सायलीचा गैरसमज होणार आहे. आपण इतके दिवस मधुभाऊंना सोडवण्यासाठी प्रयत्न करत होतो. पण, अर्जुन सर, मुद्दाम त्यांची केस लांबणीवर टाकणार आहेत, हा किती मोठा विश्वासघात आहे, असं तिला वाटणार आहे. त्यामुळे आता सायली मधुभाऊंना भेटायला जाऊन या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. यासाठी ती आता तुरुंगात पोहोचणार आहे.