अखेर साक्षीला मिळणार कोर्टाची नोटीस! शिवानी देणार खरी साक्ष! ‘ठरलं तर मग’मध्ये थरारक वळण!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अखेर साक्षीला मिळणार कोर्टाची नोटीस! शिवानी देणार खरी साक्ष! ‘ठरलं तर मग’मध्ये थरारक वळण!

अखेर साक्षीला मिळणार कोर्टाची नोटीस! शिवानी देणार खरी साक्ष! ‘ठरलं तर मग’मध्ये थरारक वळण!

May 28, 2024 01:49 PM IST

साक्षीच्या घरी कोर्टाची नोटीस आल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे. कोर्टाची नोटीस साक्षी चैतन्यला देखील दाखवणार आहे.

अखेर साक्षीला मिळणार कोर्टाची नोटीस! शिवानी देणार खरी साक्ष!
अखेर साक्षीला मिळणार कोर्टाची नोटीस! शिवानी देणार खरी साक्ष!

छोट्या पडद्यावरची ‘ठरलं तर मग’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर गारुड घालत आहे. या मालिकेत आता थरारक वळण येणार आहे. मधुभाऊंच्या केसमुळे सुरू झालेली ही मालिका आता याच केसवर पुढे जाताना दिसणार आहे. मधुभाऊंच्या केसमध्ये आता महत्त्वाचे पुरावे अर्जुन आणि सायलीच्या हाती लागले आहेत. याच पुराव्यांमुळे आता साक्षीला कोर्टाकडून नोटीस मिळणार आहे. साक्षीच्या ड्रिंकमध्ये झोपेचं औषध मिसळून तिच्या फोनमधून सगळे पुरावे चैतन्यने मिळवले आहेत. हे पुरावे चैतन्यने तातडीने सायली आणि अर्जुनच्या हवाली केले आहेत. याच पुराव्यांच्या आधारावर आता अर्जुन केसची पुढची सुनावणी करण्याची मागणी करणार आहे.

साक्षीच्या घरी कोर्टाची नोटीस आल्यावर तिच्या पायाखालची जमीनच सरकणार आहे. कोर्टाची नोटीस साक्षी चैतन्यला देखील दाखवणार आहे. तर, घाबरलेल्या साक्षीला चैतन्यने शांत करायचा प्रयत्न करणार आहे. दुसरीकडे रविराज अर्जुनला फोन करून कोर्टाच्या नोटिसीविषयी सांगणार आहे. त्यावेळी अर्जुन देखील रविराजला सांगणार आहे की, मलाही आश्रम केसमध्ये काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. दुसरीकडे, अर्जुन आणि सायली, शिवानी जाधवला शोधत असतात. मधुभाऊंच्या आश्रम केस मधील ती एक महत्त्वाची साक्षीदार असते. मात्र, कोर्टात म्रृत झाली असल्याचे, सांगण्यात आलं आहे.

कान्स गाजवल्यानंतर भारतात परतलेल्या छाया कदम यांची पहिली पोस्ट! म्हणाल्या ‘तुमच्यामुळे आज ही छाया...’

सायली शिवानीला शोधून काढणार!

मात्र, सायली आणि अर्जुन शिवानीला शोधून काढतात. सुरुवातीला शिवानी जबाब देण्यास नकार देते. मात्र, सायली तिची समजूत काढून तिला खरी साक्ष देण्यासाठी तयार करते. शिवानी जाधव कोर्टात साक्ष द्यायला तयार असल्याचं सायली अर्जुनला सांगते. यानंतर शिवानीचा जीव सुखरूप रहावा, म्हणून सायली तिला स्वतःसोबत सुभेदारांच्या घरी घेऊन येते. अर्जुन, सायली आणि शिवानीला एकत्र पाहून सुभेदार कुटुंबाच्या चेहऱ्यावर प्रश्न चिन्हं उभे राहतात. ही मुलगी कोण आहे? असा प्रश्न पूर्णा आजी सायली आणि अर्जुन यांना विचारते. यावर ही सायलीची आश्रमातील एक मैत्रीण असून, आत्ताच आम्हाला बाजारात भेटली, असं अर्जुन आजीला उत्तर देणार आहे.

प्रिया शिवानीला बघणार!

त्यावर सायली सगळ्यांना एक प्रश्न विचारते की, ‘मला ही मैत्रीण खूप दिवसांनी भेटली आहे. तुम्हा सगळ्यांची हरकत नसेल, तर ही आजच्या दिवस आपल्याकडे राहिली तर चालेल का?’. मात्र, यावर सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगळेच भाव उमटतात. परंतु, सगळे तिला घरात राहण्याची परवानगी देतात. जेवणाच्या टेबलवर शिवानी जेवायला बसलेली असतानाच, तिथे प्रियाची म्हणजेच खोट्या तनवीचे एन्ट्री होणार आहे. प्रियाने शिवानीला पाहू नये, म्हणून सायली तातडीने शिवानीला वरच्या खोलीत घेऊन जाणार आहे. मात्र, त्यावेळी प्रियाचं लक्ष शिवानीकडे जाणार आहे. आता शिवानीला सुभेदारांच्या घरात पाहिल्यानंतर प्रिया साक्षीला या सगळ्या गोष्टी सांगणार का? आणि अर्जुन त्याला मिळालेला पुरावा कोर्टात सादर करू शकेल का? हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner