Tharala Tar Mag: प्रियाचा डाव फसणार; पूर्णा आजी तिलाच कानफटवणार! ‘ठरलं तर मग’मध्ये अनपेक्षित वळण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: प्रियाचा डाव फसणार; पूर्णा आजी तिलाच कानफटवणार! ‘ठरलं तर मग’मध्ये अनपेक्षित वळण

Tharala Tar Mag: प्रियाचा डाव फसणार; पूर्णा आजी तिलाच कानफटवणार! ‘ठरलं तर मग’मध्ये अनपेक्षित वळण

Jun 28, 2024 03:41 PM IST

Tharala Tar Mag 28 June 2024 Serial Update: अर्जुन आणि सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर प्रियाच्या हाती लागले असून, आता ती ही फाईल घेऊन थेट सुभेदारांचं घर गाठणार आहे.

Tharala Tar Mag 28 June 2024 Serial Update
Tharala Tar Mag 28 June 2024 Serial Update

Tharala Tar Mag 28 June 2024 Serial Update:ठरलं तर मग’ या मालिकेत आज धमाल पाहायला मिळणार आहे. प्रियाने अखेर शर्थीचे प्रयत्न करून अर्जुन आणि सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल ऑफिसमधून चोरली आहे. अर्जुनच्या कपाटाच्या डुप्लिकेट चाव्या बनवून प्रियाने आपला हा मनसुबा साध्य केला आहे. मध्यरात्रीच्या दरम्यान ऑफिसमध्ये कुणीही नाही, हे बघून तिने कपाटातून हळूच फाईल शोधायला सुरुवात केली होती. यावेळी तिच्या हाताला एक फाईल लागली. ही फाईल तिने उघडून पाहिली, तर त्यात अर्जुन आणि सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर होते. आता ही फाईल घेऊन प्रिया म्हणजेच खोटी तन्वी थेट सुभेदारांचं घर गाठणार आहे.

इकडे सायली आणि अर्जुन छान गप्पा रंगवत बसलेले असताना, त्यांना प्रियाच्या ऑफिसमध्ये येण्याचा मनसुबा लक्षात येणार आहे. यामुळे दोघेही तातडीने ऑफिसमध्ये जायला निघणार आहे. ऑफिसमध्ये पोहोचताच अर्जुन प्रियाला तिथून घाईघाईने निघताना बघणार आहे. तर, आपल्या कपाटातून कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल देखील गायब झाल्याचं अर्जुन आणि सायली यांना कळणार आहे. यावेळी दोघेही समजून जाणार आहेत की, ती फाईल प्रियानेच चोरून नेली आहे. यावरून आता चांगलाच गदारोळ माजणार आहे.

Hina Khan News: धक्कादायक! टीव्हीची ‘अक्षरा बहु’ हिना खानला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर; सांगताना अभिनेत्री झाली भावूक

प्रिया फाईल घेऊन पोहोचणार सुभेदारांच्या घरी!

मध्यरात्री काहीही वेळ काळ न बघता प्रिया थेट सुभेदारांच्या घरी पोहोचणार आहे. मात्र, प्रिया घरी पोहोचायच्या आधीच सायली आणि अर्जुन घरी जाणार आहेत. प्रिया इतक्या रात्री इथे काय करतेय, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मात्र, तिला आधी आत येऊ द्या, मग सगळं कळेल, असं म्हणत पूर्णा आजी प्रियाला घरात घेण्यास सांगणार आहेत. यावेळी घरात शिरताच प्रिया घाबरल्याचं खोटं नाटक करत तुम्हा सगळ्यांना काय आणि कसं सांगू कळत नाहीये, असं म्हणणार आहे. यावेळी अस्मिता तिला काय झालं ते सगळं सांग, असं म्हणणार आहे. तर प्रिया आता सायली आणि अर्जुन यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल थेट पूर्णा आजीच्या हातावर ठेवणार आहे.

प्रियाचा डाव फसणार?

सायली आणि अर्जुन यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल पूर्णा आजीच्या हातात दिल्यावर प्रिया आपला तमाशा सुरू करणार आहे. ‘मी इतके दिवस सगळ्यांना सानाग्त होते की, या दोघांचं लग्न खोटं आहे. पण आज माझ्याकडे याचे पुरावेच आलेले आहेत. तुम्हाला विश्वास नसेल तर ही फाईल उगडून पेपर तपासून घ्या’, असं प्रिया सगळ्यांना सांगते. यावर चैतन्य तिला चांगलंच ऐकवतो. यानंतर आता संतापलेली पूर्णा आजी सायलीला घराबाहेर काढेल की काय असं वाटत असतानाच, आजी पालटून थेट प्रियाच्या कानशिलात लगावणार आहे. आता याम्गाने नेमकं कारण काय आहे, हे मालिकेच्या येत्या भागात कळणार आहे.

Whats_app_banner