मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 28th Feb: मनातल्या प्रेम भावना व्यक्त करण्याआधीच अर्जुन सुभेदारवर कोसळणार मोठं संकट!

Tharala Tar Mag 28th Feb: मनातल्या प्रेम भावना व्यक्त करण्याआधीच अर्जुन सुभेदारवर कोसळणार मोठं संकट!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 28, 2024 04:53 PM IST

Tharala Tar Mag 28 February 2024 Serial Update: चैतन्य अर्जुनचा एकमेव आणि जवळचा मित्र आहे. मात्र, आज तोच त्याच्यापासून दूर झाल्यापासून अर्जुन प्रचंड अस्वस्थ झाला आहे.

Tharala Tar Mag 28 February 2024
Tharala Tar Mag 28 February 2024

Tharala Tar Mag 28 February 2024 Serial Update: सायली आणि अर्जुन यांच्या आयुष्यात आसू आणिया हसू असे दोन्ही प्रसंग एकाचवेळी घडताना दिसत आहेत. सायली आणि अर्जुन यांच्यातील नातं खोटं असलं तरी त्यांच्यात आता खरी मैत्री निर्माण होत आहे. चैतन्यने आपली साथ सोडल्याने आता अर्जुन प्रचंड दुखावला गेला आहे. चैतन्य अर्जुनचा एकमेव आणि जवळचा मित्र आहे. मात्र, आज तोच त्याच्यापासून दूर झाल्यापासून अर्जुन प्रचंड अस्वस्थ झाला आहे. तर, सायली मात्र अर्जुनची अवस्था ओळखून त्याला सतत सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. मालिकेच्या नव्या भागामध्ये आता अर्जुन आणि त्याच्या कुटुंबावर मोठं संकट कोसळणार आहे.

नुकतीच अर्जुनने रस्त्यावर जाणाऱ्या एका व्यक्तीशी हाणामारी केली होती. आधीच वैतागलेला अर्जुन सायली खरेदीसाठी पुढे गेली असताना, रस्त्याच्या कडेलाच फोनवर काहीतरी करत उभा होता. मात्र, त्याचवेळी एका दुचाकीस्वाराचा त्याला धक्का लागला. यानंतर दुचाकीस्वार पुन्हा मागे येऊन अर्जुनला बडबड करू लागला. तुमच्यासारखी श्रीमंत बापाची बिघडलेली मुलं अशीच रस्त्याच्या कडेला उभी राहून फोनच्या नादात दुसऱ्याच नुकसान करतात, असे तो व्यक्ती म्हणू लागला. यानंतर त्या व्यक्तीने अर्जुनकडे पैशांची मागणी देखील केली. आधी शांतपणे ऐकून घेत असलेला अर्जुनचा आपल्या रागावरचा ताबा सुटतो आणि तो त्या व्यक्तीला मारू लागतो. हे पाहून आता सायली वादात उडी घेऊन दोघांना थांबवणार आहे.

TMKOC: ‘तारक मेहता..’ मालिकेतील पहिली ‘सोनू’ आठवतेय का? ‘या’ कारणामुळे मालिकेतून झाली होती आऊट!

चैतन्य दुरावल्यामुळेच अर्जुन असा वागत आहे, हे सायलीच्या लक्षात आले आहे. आता अर्जुनची समजूत कशी काढावी यासाठी ती अर्जुनला एका आश्रमात घेऊन जाणार आहे. यावेळी त्या आश्रमात एका आजोबांचा वाढदिवस साजरा होत असतो. ते दृश्य दाखवून आता सायली अर्जुनला समजावणार आहे. या आजोबांना त्यांच्या मुलाने काही दिवस राहायला जा असं सांगून इथे पाठवलं आणि तो नंतर पुन्हा कधीच परतून आला नाही, त्यांना कसं वाटलं असेल याचा विचार करा, असे सायली अर्जुनला म्हणणार आहे. तुमच्या आयुष्यातून केवळ चैतन्य काही गैरसमजुतीमुळे दूर झाला आहे, पण स्वतःच्या मुलाने धोका देण्याइतकं मोठं दुःख नाहीये, असे म्हणत सायली अर्जुनला समजावते.

अर्जुन आता सायलीच्या या रूपावर देखील भालणार आहे. यावेळी सायलीला आपलं तिच्यावर प्रेम असल्याचं सांगूनच टाकायचं, असा विचार करून प्लॅनिंग करत असतानाच आता सुभेदारांच्या घरावर पोलिसांची धड पडणार आहे. अर्जुनच्या वडिलांची औषधांची कंपनी असून, त्यातून सामान घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये ड्रग्ज सापडल्याने आता त्यांना अटक करायला पोलीस घरात आले आहेत. आता हे ड्रग नेमके कुठून आले? की हाही कुणाचा तरी डाव आहे, हे शोधण्याचा नवा टास्क अर्जुन आणि सायलीच्या हाती येणार आहे.

IPL_Entry_Point