मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सायलीचं कौतुक होणार; रविराजही माफी मागणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार? वाचा...

सायलीचं कौतुक होणार; रविराजही माफी मागणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार? वाचा...

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 27, 2024 03:55 PM IST

स्वतः महिपतने प्रताप सुभेदार यांचा जामीन करून रविराजचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळेच रविराजने सायली आणि अर्जुनवर संशय घेतला होता.

सायलीचं कौतुक होणार; रविराजही माफी मागणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार? वाचा...
सायलीचं कौतुक होणार; रविराजही माफी मागणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार? वाचा...

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात रविराज देखील अर्जुन आणि सायलीची माफी मागताना दिसणार आहे. प्रताप सुभेदार यांना पोलिसांनी पकडून नेल्यानंतर त्यांची केस महिपतने अतिशय हुशारीने रविराजच्या हाती सोपवली होती. स्वतः महिपतने प्रताप सुभेदार यांचा जामीन करून रविराजचा विश्वास संपादन केला होता. त्यामुळेच रविराजने सायली आणि अर्जुनवर संशय घेतला होता. तर, सगळ्यात महिपत संपूर्ण सुभेदार कुटुंबासाठी देव माणूस ठरला होता. नेहमीच अर्जुनच्या विरोधात केस लढवणारा रविराजदेखील यावेळी महिपतच्या बोलण्यात अडकला होता.

महिपत खोटं बोलतोय हे सगळ्यांना पटवून देण्यासाठी अर्जुन आणि सायली प्रचंड मेहनत घेत होते. अर्जुनने आपल्या वडिलांची केस लढवून, त्यांना निर्दोष मुक्तता मिळवून दिली. मात्र, घरी आल्यानंतर आता हे सगळं कसं घडलं, हे सगळ्यांना जाणून घ्यायचं होतं. यावेळी अर्जुन आणि सायली सगळी घटना सुभेदार कुटुंबांला सांगणार आहे. तर, रविराज देखील माफी मागून आपण ही केस अर्जुनच्या हातात का दिली, या मागचं कारण सांगणार आहे. ‘मी प्रतापची केस लढवत होतो. मात्र, त्यावेळी अर्जुन माझ्या ऑफिसमध्ये आला आणि त्यावेळी त्याच्याकडे काही पुरावे होते. हे पुरावे पाहिल्यानंतर मला धक्का बसला होता. ज्या महिपतवर मी इतका विश्वास ठेवला होता, त्यानेच या सगळ्या गोष्टी केल्याचं लक्षात आल्यानंतर मला खूप राग आला. मात्र, या केससाठी लागणारे सगळे महत्त्वाचे पुरावे हे अर्जुनने मेहनतीने गोळा केल्यामुळे, ही केस देखील त्यानेच लढवली पाहिजे, हे माझं मत होतं आणि म्हणूनच मी प्रतापची केस अर्जुनच्या हातात सोपवली’, असं रविराज म्हणणार आहे.

‘रोशन भाभी’ केस जिंकली; लैंगिक शोषणाच्या प्रकरणात ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यांना लाखोंचा दंड!

तर, आपलं होणारं कौतुक पाहून अर्जुन देखील बोलणार आहे की, या कौतुकाचा वाटेकरी एकटा मी नाही, मिसेस सायलीने देखील तितकीच मदत केली आहे. तिच्या हुशारीमुळेच आज बाबांना सुखरूप सोडवण्यात मदत झाली आहे. यावेळी सायलीला महिपतच्या माणसांनी कसं किडनॅप केलं आणि आपण तिला त्यातून कसं सोडवलं, याचा घटनाक्रम देखील अर्जुन घरातल्यांना सांगणार आहे.

सायलीने अतिशय हुशारीने आणि हिंमत दाखवत चुकीच्या गोष्टी विरुद्ध दिलेला हा लढा, यामुळे तिला आता सुभेदारांच्या घरात थोडा मान मिळणार आहे. तर, सायलीची ही हिंमत पाहून कल्पनाला देखील आपल्या सुनेचं कौतुक वाटणार आहे. दुसरीकडे, रविराज देखील सायलीची माफी मागणार आहे. महिपतने कशाप्रकारे संतोषचा वापर करून बाबांना अडकवायचा प्रयत्न केला, तर सायलीने संतोषच्या मुलीचा जीव वाचवून त्याचं मतपरिवर्तन कसं घडवून आणलं याबद्दल देखील अर्जुन आपल्या कुटुंबाला सांगणार आहे. हे ऐकून सगळ्यांच्याच मनातील सायली विषयीचा राग काहीसा दूर होणार आहे

IPL_Entry_Point