Tharala Tar Mag 27 June 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रिया अर्जुन आणि सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्यासाठी ऑफिसमध्ये शिरल्याचे पाहायला मिळणार आहे. आता प्रिया कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्यासाठी सगळे प्रयत्न करणार आहे. तर दुसरीकडे प्रिया ऑफिसमध्ये येऊन गेल्याचं आता सायलीला देखील कळणार आहे. प्रियाने अर्जुनच्या ऑफिसमधल्या एका गोरे नावाच्या महिलेला पैसे देऊन तिच्याकडून कपाटाच्या चाव्यांची डुप्लिकेट बनवून घेणार आहे. मात्र, त्या आधीच प्रियाच्या हाती कपाटाच्या चाव्या लागल्या. मात्र, या चाव्या आता परत काश ठेवायच्या यावरून प्रिया गोंधळी होती.
आता प्रियाच्या याच कामी गोरे बाई येणार आहेत. प्रिया या किल्ल्या गोरे बाईंकडे देऊन त्यांना अर्जुनच्या टेबलखाली ठेवण्यास सांगितल्या आहेत. यावेळी प्रिया कॅबिनमध्ये असल्याचं चैतन्यच्या लक्षात येत. तर, अर्जुन मात्र सायलीशी बोलण्यात व्यस्त आहे. यानंतर आता अर्जुन प्रियाला आपल्या केबिन मधून निघून जायला सांगतो मात्र त्यावेळी प्रियाचा आवाज सायली फोनवरून ऐकते आणि अर्जुनला विचारू लागते.
दुसरीकडे, महिपत त्याच्या आताच्या वकिलांना म्हणजेच पवार वकिलांना घरी बोलवून आश्रम केसमधून साक्षी कशी सुटेल याची नवीन योजना बनवायला सांगितली आहे. यावर पवार वकील म्हणतात की, आश्रमात खून झाला त्यावेळी साक्षी तिथे नव्हती, ती दुसरीकडे होती याचे पुरावे आपल्याला सापडले पाहिजेत. मात्र, वकिलाचे हे बोलणं ऐकताच चिडलेला महिपती त्याच्या डोक्यावर बंदूक धरतो, हे बघून पवार वकील चांगलेच घाबरून जातात. साक्षीला आश्रम खुनाच्या केसमधून निर्दोष बाहेर काढायचं असा चंग महिपतने बांधला आहे. आश्रमाची ही केस लवकर सुटली, तरच आश्रमाची जमीन आपल्या ताब्यात येऊ शकते, हेही त्याला माहित आहे.
ऑफिसमधून घरी आलेला अर्जुन आता सायलीशी गप्पा मारणार आहे. तर, प्रिया ऑफिसमध्ये का आली होती, असं सायली अर्जुनला विचारणार आहे. यावेळी सायलीला थोडासा राग देखील येणार आहे. मात्र, सायलीचा हा लटका राग अर्जुनला देखील कळला आहे. दोघेही गप्पा मारत असताना त्यांना प्रियाचे मनसुबे लक्षात येतात. ऑफिसमध्ये आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल ठेवली आहे आणि ती फाईल हवी म्हणूनच प्रिया तिथे आले असावी हे दोघांच्याही लक्षात येते. यामुळे दोघी तातडीने ऑफिसकडे जायला निघतात. ऑफिसमध्ये गेल्यावर ड्रॉवरमध्ये आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईलच नाही, हे कळल्यानंतर आता दोघांच्याही पायाखालची जमीन सरकली आहे. ही फाईल आता प्रियाच्या हाती लागली असून, आता ही फाईल ती कुणाला दाखवणार आणि काय खेळ खेळणार? हे येत्या भागात पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या