Tharala Tar Mag 27th Feb: सायली विरोधात प्रिया भरणार रविराजचे कान; चैतन्यही नव्या नोकरीत रुजू होणार!
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 27th Feb: सायली विरोधात प्रिया भरणार रविराजचे कान; चैतन्यही नव्या नोकरीत रुजू होणार!

Tharala Tar Mag 27th Feb: सायली विरोधात प्रिया भरणार रविराजचे कान; चैतन्यही नव्या नोकरीत रुजू होणार!

Published Feb 27, 2024 02:30 PM IST

Tharala Tar Mag 27 February 2024 Serial Update: चैतन्य अर्जुनची साथ सोडून रविराज यांचा हात धरणार आहे. यामुळे आता मधुभाऊंच्या केसला देखील एक वेगळं वळण मिळणार आहे.

Tharala Tar Mag 27 February 2024
Tharala Tar Mag 27 February 2024

Tharala Tar Mag 27 February 2024 Serial Update: सायली आणि अर्जुन यांच्या आयुष्यातील वादळ आता थांबण्याचे नावच घेत नाहीये. एकीकडे चैतन्य आणि अर्जुन यांच्या नात्यात दुरावा आल्याने चैतन्यने नोकरी सोडली आहे. तर, दुसरीकडे आता तो नव्या ठिकाणी कामासाठी जाणार आहे. त्याचं कामाचं हे नवं ठिकाण म्हणजे रविराज यांचं ऑफिस आहे. अर्थात आता चैतन्य अर्जुनची साथ सोडून रविराज यांचा हात धरणार आहे. यामुळे आता मधुभाऊंच्या केसला देखील एक वेगळं वळण मिळणार आहे. तर, दुसरीकडे प्रिया देखील आता नवा डाव खेळणार आहे.

सुभेदारांच्या घरात पूर्णा आजी सायलीच्या विरोधात आहे. पूर्णा आजी सतत सायलीचा दुस्वास का करते, असा प्रश्न कल्पनाला पडला आहे. आता कल्पना स्वतः याबद्दल पूर्णा आजीशी बोलणार आहे. सायलीने कामाला जावं यासाठी कल्पना पूर्णा आजीची मनधरणी करणार आहे. मात्र, आजी पुन्हा आपला राग व्यक्त करणार आहे. आता अश्विन दोघींमध्ये पडून, सायलीला एक संधी द्यायला हवी, अशी विनंती पूर्णा आजीकडे करणार आहे. मात्र, सायलीसाठी आपली सून कल्पना आपल्याच विरोधात जातेय ही, गोष्ट पूर्णा आजीला अजिबात आवडत नाही. परंतु, माझ्या अर्जुनच्या चांगल्यासाठी माझी सून जे काही करेल, त्यात मी तिच्या पाठीशी ठामपणे उभी राहीन, असं पूर्णा आजी म्हणते.

Sidhu Moose Wala Mother: सिद्धू मुसेवालाच्या घरी गुडन्यूज! दिवंगत गायकाची आई पुन्हा देणार बाळाला जन्म

चैतन्य आणि अर्जुन यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचे कळल्यानंतर रविराजलाही थोडा धक्का बसतो. तर, प्रिया पुन्हा एकदा कपटीपणा दाखवत याला सायलीच जबाबदार असेल, असे म्हणत ती रविराजचे कान भरण्यास सुरुवात करते. याच आगीत साक्षी तेल टाकण्याचं काम करते. साक्षी भावूक होण्याचं नाटक करत, अर्जुनने कसे आपल्यावर खोटे आरोप केले, ते रविराजला सांगू लागणार आहे. इतकं सगळं ऐकल्यानंतर आता रविराज चैतन्यला आपल्या फर्ममध्ये नोकरी ऑफर करणार आहे. तर, चैतन्य देखील कशाचाही विचार न करता ही नवी नोकरी लगेच स्वीकारणार आहे.

रविराज आता आपल्या घरातील सगळ्यांनाच चैतन्य गडकरी उद्यापासून आपल्या फर्ममध्ये जॉईन होत असल्याचे सांगणार आहे. याचबरोबर तो अर्जुन व चैतन्य मध्ये कसे भांडण झाले हे देखील सांगणार आहे. यातच आता प्रिया पुन्हा सायलीमुळेच हे सगळे झाले असणार, असे म्हणणार आहे. सायली आश्रमातसुद्धा भांडणं लावून द्यायची, असं प्रिया सांगणार आहे. आता सायलीला आणि रविराजला धोका देण्यासाठी प्रिया खोट्या बॉयफ्रेंडला पुन्हा पाचारण करणार आहे.

Whats_app_banner