Tharala Tar Mag: सायलीच्या जीवावर बेतणार; प्रियाचा खरा चेहरा आता तरी सगळ्यांच्या समोर येणार का?-tharala tar mag 27 august 2024 serial update will priya s real face come in front of everyone now ,मनोरंजन बातम्या
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: सायलीच्या जीवावर बेतणार; प्रियाचा खरा चेहरा आता तरी सगळ्यांच्या समोर येणार का?

Tharala Tar Mag: सायलीच्या जीवावर बेतणार; प्रियाचा खरा चेहरा आता तरी सगळ्यांच्या समोर येणार का?

Aug 27, 2024 12:05 PM IST

Tharala Tar Mag 27 August 2024 Serial Update:सायलीच्या या थप्पडचा बदला घ्यायचाच असं प्रियाने मनोमन ठरवलं आहे. यासाठी आता ती अर्जुनचा वापर करणार आहे.

Tharala Tar Mag 27 August 2024: प्रियाचा खरा चेहरा आता तरी सगळ्यांच्या समोर येणार का?
Tharala Tar Mag 27 August 2024: प्रियाचा खरा चेहरा आता तरी सगळ्यांच्या समोर येणार का?

Tharala Tar Mag 27 August 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता प्रिया सायलीचा बदल घेताना दिसणार आहे. प्रिया प्रतिमा आत्यांना त्रास देतेय हे बघून सत्पलेल्या सायलीने प्रियाच्या कानाखाली सणसणीत आवाज काढला. याचाच राग आता प्रियाच्या मनात बसला आहे. काहीही झालं तरी सायलीच्या या थप्पडचा बदला घ्यायचाच असं प्रियाने मनोमन ठरवलं आहे. यासाठी आता ती अर्जुनचा वापर करणार आहे. मुद्दाम अर्जुनच्या फोनमध्ये डोकावून ती सगळी माहिती काढून घेणार आहे. तर, याच माहितीचा वापर करून आता ती सायलीचा छळ करणार आहे. मात्र, प्रियाचा हा डाव आता सायलीच्या जीवावर बेतणार आहे.

प्रिया मुद्दामहून प्रतिमा आत्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत होती. प्रतिमा आत्याला काही जुनं आठवू नये, म्हणून ती सतत त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, आता प्रिया प्रतिमा आत्यांना धमकावत असताना सायली ते बघणार आहे. प्रियाला सारखं समजावून देखील ती ऐकत नाहीये. हे बघून संतापलेली सायली आता तिच्यावर हात उचलणार आहे. घाबरलेल्या प्रतिमा आत्यांसामोरच सायली प्रियाच्या कानाखाली आवाज काढून झाली. यामुळे आता प्रिया खूप संतापली आहे. मात्र, सुभेदारांच्या घरात टिकून राहायचे असल्याने ती फार काही करू शकत नाहीये. त्यामुळे ती तिथून गप्प निघून जाणार आहे. मात्र, ती याचा बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

Jui Gadkari: जुई गडकरीवर झाली शस्त्रक्रिया, म्हणाली 'शुटिंग वगैरे थांबलंय असं...'

प्रिया सायलीला त्रास देणार

सायलीचा बदला घेण्याची संधी आता प्रियाकडे चालून येणार आहे. सायली नाश्त्याची तयारी करत असताना, प्रिया आधीच अर्जुनच्या बाजूची जागा पकडून डायनिंग टेबलवर बसणार आहे. त्याचवेळी अर्जुनचा फोन वाजणार आहे. अर्जुनचा फोन वाजतोय हे बघून आता प्रिया त्याच्या फोनमध्ये डोकावणार आहे. त्यावेळी अर्जुन दुपारी लंच मिटींगला जाणार आहे, हे तिला कळणार आहे. यावरूनच आता ती सायलीला डिवचणार आहे. अर्जुन आपल्याला घेऊन लंचला जात असल्याचं ती सायलीच्या कानावर टाकणार आहे. मात्र, अर्जुन असं काहीच करणार नाही यावर सायलीचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे आता ती ऑफिस गाठणार आहे. मात्र, तिथे तिला अर्जुन न भेटल्याने तिच्या मनात संशयाची पाल चुकचुकणार आहे.

सायलीच्या जीवावर बेतणार

मात्र, सायली कोणताही पूर्वग्रह मनात न ठेवता घरी परतल्यावर अर्जुनला विचारू, असा विचार करून घरी परतणार आहे. मात्र, घरी परत आल्यावर सायली प्रियाला आपल्या रुममध्ये जाण्यापासून अडवणार आहे. मात्र, त्यावेळी प्रिया तिला ढकलून देणार आहे. यामुळे आता सायली जिन्यावरून खाली कोसळणार असून, बेशुद्ध होणार आहे. आता यानंतर प्रियाचं खरं रूप सगळ्यांसमोर येईल का? हे लवकरच कळणार आहे.