ठरलं तर मग : बाप मागणार लेकाची माफी! सायलीच्या चतुराईमुळे सुभेदारांच्या घरात आनंदाचं वातावरण
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  ठरलं तर मग : बाप मागणार लेकाची माफी! सायलीच्या चतुराईमुळे सुभेदारांच्या घरात आनंदाचं वातावरण

ठरलं तर मग : बाप मागणार लेकाची माफी! सायलीच्या चतुराईमुळे सुभेदारांच्या घरात आनंदाचं वातावरण

Mar 26, 2024 04:37 PM IST

प्रताप सुभेदार आपल्या लेकाची म्हणजेच अर्जुन सुभेदारची माफी मागणार आहेत. तर, अर्जुनदेखील आपल्या वडिलांना मोठ्या मनाने माफ करून, त्यांची गळाभेट घेणार आहे.

ठरलं तर मग : बाप मागणार लेकाची माफी! सायलीच्या चतुराईमुळे सुभेदारांच्या घरात आनंदाचं वातावरण
ठरलं तर मग : बाप मागणार लेकाची माफी! सायलीच्या चतुराईमुळे सुभेदारांच्या घरात आनंदाचं वातावरण

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना महिपतला बेड्या पडताना पाहायला मिळणार आहे. संतोषच्या मुलीचा जीव वाचवल्यामुळे तो देखील सायलीची मदत करण्यासाठी तयार झाला होता. आता संतोष कोर्टात हजर होऊन महिपत विरोधात साक्ष देणार आहे. आजच्या भागाच्या सुरुवातीलाच संतोष कोर्टात आपली साक्ष देताना पाहायला मिळणार आहे. महिपतच्या गुंडांनी आपल्या कुटुंबाला त्रास देऊन हे सगळं काम करून घेतल्याचे तो म्हणणार आहे. तर, ही घटना सुरू झाल्यापासून ते पुराव्यांचा पेनड्राईव्ह सायलीपर्यंत पोहोचवण्यापर्यंत काय काय घडलं हे तो कोर्टासमोर सांगणार आहे. संतोषचा जबाब पूर्ण झाल्यावर अर्जुन आपला युक्तिवाद मांडणार आहे.

यावेळी अर्जुन म्हणणार आहे की, महिपत शिखरे हाच या ड्रग्ज केसचा मुख्य सूत्रधार असून, पुरावे बाहेर येऊ नयेत म्हणून त्याने मिसेस सायली सुभेदार यांना देखील किडनॅप केले होते. भर कोर्टात सायलीबद्दल हे ऐकल्यावर सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. तर, सायली किडनॅप झाली होती आणि तिला कोणी किडनॅप केलं होतं, हे देखील अर्जुनला माहिती आहे, हे कळल्यानंतर साक्षी आणि महिपतचे धाबे दणाणले आहेत. यावेळी सायली देखील आपला जबाब नोंदवणार आहे. सायली तिच्यासोबत घडलेला सगळा प्रकार कोर्टासमोर सांगणार आहे. सायली सांगत असलेला सगळा घटनाक्रम ऐकल्यावर सुभेदार कुटुंबासह तिथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनाच मोठा धक्का बसणार आहे.

Viral Video: पोरीने नशीब काढलं! माधुरी दीक्षितच्या नवऱ्याने बनवल्या पुरणपोळ्या! व्हिडीओ होतोय व्हायरल

प्रताप सुभेदार मानाने घरी परतणार!

सायली सुभेदार ही माझी बायको, तर प्रताप सुभेदार हे माझे बाबा असून, केवळ आश्रमाच्या केसमध्ये फेरफार करण्यासाठी आमच्या कुटुंबियांना त्रास दिला जात असल्याचे अर्जुन कोर्टापुढे सांगणार आहे. यावेळी निकाल अर्जुनच्या बाजूने लागणार असून, महिपत शिखरे हा आरोपी ठरणार आहे. तर, त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार असून, प्रताप यांची निर्दोष सुटका होणार आहे. आता प्रताप सुभेदार यांना घेऊन सुभेदार कुटुंब मानाने घरी परतणार आहे. तर, सायलीला सगळा दोष दिल्यामुळे प्रताप सुभेदार यांना वाईट वाटत आहे. ज्या मुलाला आपण इतकी दूषणे दिली, त्याने आज आपल्याला निर्दोष सिद्ध केलं, यामुळे प्रताप सुभेदार मनातून खजील झाले आहेत. प्रताप सुभेदार निर्दोष घरी परतल्यामुळे सुभेदार कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

घटस्फोट दूरच... एकमेकांच्या रंगात रंगले ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चन! फोटो पाहून चाहते सुखावले

बाप मागणार लेकाची माफी

या निमित्ताने सुभेदार कुटुंबात सेलिब्रेशन देखील होणार आहे. मात्र, यात प्रताप सुभेदार भाग घेणार नाहीत. अर्जुन आपल्या वडिलांवरील आरोप चुकीचे ठरल्यामुळे आनंदी आहे. या सगळ्या आनंदात तो आपल्या वडिलांना शोधत आहे, हे सायलीच्या लक्षात आल्यावर ती प्रताप सुभेदार यांच्या खोलीत जाऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करणार आहे. इतक्या सगळ्या आनंदाच्या वातावरणात तुमचा मुलगा तुम्हाला शोधतोय, असं बोलून सायली त्यांना खाली नेण्याचा प्रयत्न करणार आहे. तर, प्रताप सुभेदार हे देखील खाली येऊन सगळ्यांसमोर अर्जुनची माफी मागणार आहेत. प्रताप सुभेदार आपल्या लेकाची म्हणजेच अर्जुन सुभेदारची माफी मागणार आहेत. तर, अर्जुनदेखील आपल्या वडिलांना मोठ्या मनाने माफ करून, त्यांची गळाभेट घेणार आहे.

Whats_app_banner