Tharala Tar Mag: जे घडायला नको तेच घडणार! अर्जुन-सायली नव्या संकटात अडकणार; ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag: जे घडायला नको तेच घडणार! अर्जुन-सायली नव्या संकटात अडकणार; ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Tharala Tar Mag: जे घडायला नको तेच घडणार! अर्जुन-सायली नव्या संकटात अडकणार; ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Published Jun 26, 2024 02:04 PM IST

Tharala Tar Mag 26 June 2024 Serial Update: अर्जुन आणि सायली यांचं लग्न खरं नसून, त्यांच्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं, ही गोष्ट आता प्रियाला देखील कळली आहे.

Tharala Tar Mag 26 June 2024 Serial Update
Tharala Tar Mag 26 June 2024 Serial Update

Tharala Tar Mag 26 June 2024 Serial Update: ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सगळ्यांनाच एक अनपेक्षित धक्का बसणार आहे. अर्जुन आणि सायलीच्या यांच्या मागे सध्या संकटांचं शुक्लकाष्ट लागलं आहे. एक प्रकरण संपत नाही, तोवर दोघांसमोर नवीन संकट उभं राहत आहे. साक्षीने केलेल्या आरोपांमधून अर्जुनची सुटका होतच होती की, आता प्रियामुळे सायली-अर्जुन यांचं नातं धोक्यात येणार आहे. ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रिया अर्जुनच्या ऑफिसमध्ये शिरून अर्जुन आणि सायली यांच्या लग्नाची फाईल शोधताना दिसणार आहे.

अर्जुन आणि सायली यांचं लग्न खरं नसून, त्यांच्या दोघांमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं होतं, ही गोष्ट आता प्रियाला देखील कळली आहे. त्यामुळे काहीही करून दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल आपल्या हाती लागतील पाहिजे, असे प्रयत्न प्रिया करत आहे. अर्जुन आणि सायली यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधण्यासाठी प्रिया रात्रीच्या वेळी हळूच अर्जुनच्या ऑफिसमध्ये शिरकाव करणार आहे. कपाटाची चावी मिळवण्यासाठी प्रिया आधीच ऑफिसमध्ये गेली होती. त्यावेळी चैतन्य आणि अर्जुनने बहाणा करून तिथून काढता पाय घेतल्याने प्रियाला आयती संधीच मिळाली होती.

‘एक-दोन दिवस द्या, सगळ्यांना उत्तरं देतो’; सोनाक्षीच्या लग्नावर लवनंतर भाऊ कुशदेखील वैतागून म्हणाला...

अर्जुनला लक्षात येणार प्रियाचा डाव

दोघेही ऑफिसमध्ये नाहीत, हे बघताच तिनं ऑफिसच्या ड्रॉवरची चावी टेबलवरून चोरली होती. दुसरीकडे अर्जुनच्या मनात सतत संशय येत होता की, प्रिया उगाचच ऑफिसमध्ये येणार नाही आणि आपली चौकशी करण्यासाठी तर मुळीच येणार नाही. तिचा नक्कीच काहीतरी हेतू असला पाहिजे. त्याशिवाय ती ऑफिसमध्ये पाऊल ठेवणार नाही. या विषयावर तो बोलत असतानाच त्याच्या डोक्यात प्रकाश पडणार आहे. आपल्या ऑफिसमध्ये लग्नाच्या कॉन्ट्रॅक्टची फाईल ठेवण्यात आली आहे, कदाचित ही फाईल शोधण्यासाठीच प्रिया ऑफिसमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे, हे आता अर्जुनच्या लक्षात येणार आहे. आता ही गोष्ट लक्षात आल्यावर अर्जुन तडक ऑफिसला जायला निघणार आहे.

प्रियाचा डाव सफल होणार

मात्र, सायली आणि अर्जुन ऑफिसला पोहोचायच्या आधीच प्रिया तिथे पोहोचलेली आहे. रात्रीच्या वेळी ऑफिसमध्ये कोणीच नाहीये, हे पाहून प्रिया आता प्रत्येक ड्रॉवरमध्ये कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल शोधायला सुरूवात करणार आहे. तर, अर्जुनच्याच कपाटात तिला लग्नाची ही फाईल सापडणार आहे. ही फाईल घेऊन आता प्रिया तिथून निघून जाणार आहे. प्रिया तिथून गेल्यानंतर सायली आणि अर्जुन देखील ऑफिसमध्ये पोहोचणार आहेत. सायली धावत जाऊन अर्जुनच्या केबिनमध्ये तपासणी करणार आहे. त्यावेळी अर्जुनच्या डेस्कवरील काही कागदपत्र खाली पडल्याचे तिच्या लक्षात येणार आहे. तर, अर्जुनच्या ड्रॉवरचा दरवाजा देखील उघडा असल्याचं सायली बघणार आहे. हे बघून आता सायली अर्जुनला बोलवणार आहे. दोघांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची फाईल अखेर प्रियाच्या हाती लागल्याने या दोघांच्या अडचणी चांगल्याच वाढणार आहेत.

Whats_app_banner