Tharala Tar Mag 25th Dec: पुरावे शोधण्यासाठी आश्रमात गेलेले सायली-अर्जुन पोलिसांच्या तावडीत सापडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 25th Dec: पुरावे शोधण्यासाठी आश्रमात गेलेले सायली-अर्जुन पोलिसांच्या तावडीत सापडणार?

Tharala Tar Mag 25th Dec: पुरावे शोधण्यासाठी आश्रमात गेलेले सायली-अर्जुन पोलिसांच्या तावडीत सापडणार?

Published Dec 25, 2023 03:21 PM IST

Tharala Tar Mag 25th December 2023 Serial Update: मधुभाऊंच्या केसमधले पुरावे शोधण्यासाठी अर्जुन-सायली बंद आश्रमात शिरणार आहेत.

Tharala Tar Mag 25th December 2023
Tharala Tar Mag 25th December 2023

Tharala Tar Mag 25th December 2023 Serial Update: मधुभाऊंना खोट्या गुन्ह्यातून सोडवण्यासाठी आता सायली आणि अर्जुन यांनी आपले सगळे प्रयत्न पणाला लावले आहेत. मधुभाऊंना खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात आल्याचं सिद्ध करण्यासाठी अर्जुन सगळे पुरावे गोळा करत आहे. यात आता सायली देखील त्याची साथ देणार आहे. आश्रमात झालेल्या खुनात मधुभाऊंचा काहीही हात नाही, हे आता जरी सगळ्यांच्या लक्षात आलं असलं तरी पुराव्यांअभावी कुणीही त्यांना या प्रकरणातून सोडवू शकत नाहीये. आता याच केसमधले पुरावे शोधण्यासाठी अर्जुन-सायली बंद आश्रमात शिरणार आहेत.

विलासच्या खुनानंतर आश्रम पोलिसांकडून बंद करण्यात आले आहे. त्या आश्रमात कुणालाही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, आता याच आश्रमात आपल्याला काहीतरी पुरावा मिळेल या आशेने अर्जुन आणि सायली यांनी गपचूप आश्रमात शिरण्याचा निर्णय घेतला होता. या प्लॅन प्रमाणे दोघेही रात्री उशीरा सगळ्यांच्या नजरा चुकवून या आश्रमात शिरणार आहेत. मात्र, यावेळीच एक मोठा गोंधळ होणार आहे. आश्रमात कुणीतरी शिरलं आहे, याची खबर पोलिसांना लागणार आहे.

Marathi Natak: 'श्री शिवाजी मंदिर'मध्ये नाटकं होणार नाहीत? नेमकं सत्य काय? वाचा...

यावेळी पोलीस देखील आश्रमात पोहोचणार आहे. बंद आश्रमात कोण शिरलंय हे शोधण्यासाठी आता पोलीस आश्रमात जाणार आहेत. पोलिसांना अचानक आलेलं पाहून सायली आणि अर्जुन देखील गोंधळून जाणार आहेत. पोलिसांना पाहून दोघेही एका गवताच्या पेंढ्यामागे लपणार आहेत. पोलिसांना गवताच्या पेंढ्यातून हालचाल जाणवल्यामुळे पोलीस या पेंढ्यावर काठीने जोरात मारणार आहेत. यावेळी सायलीला वाचवताना हा मार अर्जुनला लागणार आहे. तर, अर्जुनला मुकाट्याने मार सहन करताना पाहून सायलीला देखील वाईट वाटणार आहे.

आता आश्रमातील गवताच्या पेंढ्यात लपलेले सायली-अर्जुन पोलिसांना सापडतील का? सायली आणि अर्जुनला मधुभाऊंच्या केसमधला पुरावा सापडेल का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

Whats_app_banner