Tharala Tar Mag 25 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन केस सुटण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकताना दिसणार आहे. पण आता त्याच्या वाटते एक मोठा ट्वीस्ट येणार आहे. मधुभाऊ तुरुंगातून सुटले की, सायली त्यांच्यासोबत निघून जाणार ही गोष्ट अर्जुनला कळली आहे. यामुळे अर्जुन मनातून खचत चालला आहे. त्याच्या मनातील हीच गोष्ट तो चैतन्यला बोलून दाखवणार आहे. यावर चैतन्य त्याला एक आयडिया देणार आहे. तो मधुभाऊंना तुरुंगातून इतक्यात सोडवू नकोस, असं अर्जुनला सांगणार आहे.
अर्जुन आणि चैतन्य केसचा पुढचा तपास करण्यासाठी काही कागदपत्र तपासत ऑफिसमध्ये बसलेले असतात. त्याचवेळी अर्जुनला काही गोष्टी लक्षात येतात. अर्जुन जेवता जेवता उठून काही पेपर घेऊन चैतन्याच्या पुढ्यात बसतो. अर्जुनला जेवण अर्धवट टाकताना बघून, चैतन्य त्याला म्हणतो की, ‘आधी तू जेवण तरी उरकून घे, केसचे पेपर आपण मग तपासू.’ यावर अर्जुन त्याला म्हणतो की, ‘चैतन्य आता मी तुला जेव्हा मला भाजी वाढायला सांगितली, तेव्हा तू कोणत्या हाताचा वापर केलास?’ यावर चैतन्य उत्तर देतो की, उजव्या हाताचा. तर, अर्जुन त्याच्या समोर एक परिस्थिती ठेवत त्याला सांगतो की, ‘कल्पना कर तुला एखाद्यावर गोळी चालवायची आहे. तर, तू बंदूक कोणत्या हातात पकडशील?’
यावर त्याला उत्तर देताना चैतन्य म्हणतो की, सहाजिक मी माझ्या उजव्या हाताने बंदूक पकडेन. कारण डाव्या हाताने मला ती सांभाळता येणार नाही. हे ऐकताच अर्जुन त्याच्यासमोर एक रिपोर्ट ठेवतो आणि म्हणतो की, ‘चैतन्य हा रिपोर्ट मला सायलीने दिला होता. पोलिसांच्या या रिपोर्टमध्ये स्पष्ट म्हटलं गेलं आहे की, विलासला गोळी ही उजव्या हाताने मारण्यात आली होती. अर्थात मारणाऱ्या व्यक्तीने उजव्या हातात बंदूक पकडले होते. परंतु, मधुभाऊ यांच्या उजव्या हाताला त्रास असल्यामुळे ते उजव्या हाताने काहीही करू शकत नाही. ते प्रत्येक काम करायला आपल्या डाव्या हाताचा वापर करतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे पोलिसांना विलासला गेलेला मेसेज हा विलासच्या खुनानंतर करण्यात आला होता.’
विलासच्या मृत्यूची वेळ आणि पोलिसांना गेलेल्या मेसेजची वेळ या दोघांमध्ये बरीच तफावत दिसते. यावरून चैतन्याच्या लक्षात येतं की, या संपूर्ण केस मधुभाऊंना निर्दोष मुक्त करण्यासाठी हे पुरावे पुरेसे आहेत. इतक्यात पोलीस स्टेशनमधून एक लेटर त्यांच्या हातात पडते. या लेटरमध्ये मधुभाऊंची वागणूक अतिशय चांगली आणि प्रेमळ असल्याचं लिहिलेलं असतं. तर याच लेटरच्या आधारावर आता आपण मधुभाऊंना किमान जामीन मिळवून देऊ शकू, असा विचार दोघेही करतात.
एकीकडे त्यांना केस सुटणार याचा आनंद होत असतो. तर, दुसरीकडे मधुभाऊ बाहेर आले की, सायली त्याला सोडून आश्रमात परत जाईल, याची भीती देखील अर्जुनला वाटत असते. आपल्या मित्राला काळजीत पडलेले बघून आता चैतन्य त्याला असा सल्ला देणार आहे की, मधुभाऊंना आपण तुरुंगातून सोडवू, मात्र आणखी काही दिवस त्यांना तुरुंगात राहू दे म्हणजे सायली वहिनी तुझ्याजवळच राहील. चैतन्य हे सांगत असतानाच सायली त्यांच्या रूममध्ये येणार आहे. आता सायली दोघांचेही बोलणं ऐकणार की, नाही हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या