Tharala Tar Mag 25 July 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात धमाकेदार कथानक पाहायला मिळणार आहे. प्रतिमा आत्याचा फोटो सायलीने तिच्या रूममध्ये आणून ठेवला होता. हा फोटो अर्जुनने बघितल्यावर त्याला धक्काच बसला. सायलीने हा फोटो घरात वर का आणला आहे, हे अर्जुनला देखील कळत नव्हते. त्यावेळी सायलीने त्या फोटोवर काही डागांचे चित्र काढून, त्यावर आपली ओढणी लपेटली आणि ती अर्जुनला सांगू लागली की, ‘अलिबागला रस्त्यावर मी ज्या बाईंना वाचवलं त्या बाई आपल्या प्रतिमा अत्याच होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर असेच डाग होते आणि त्यांनी अशी ओढणी गुंडाळली होती.’ मात्र, त्यावेळी अर्जुन सायलीचा काहीच ऐकून घेत नाही आणि तो फोटो खाली घेऊन जातो.
फोटो सायली आणि अर्जुनच्या खोलीत होता हे आहे कळल्यानंतर, पूर्णा आजी विचारते की, हा फोटो तुमच्या खोलीत कसा आला? त्यावर उत्तर देताना अर्जुन म्हणतो की, ‘सायलीने हा फोटो स्वच्छ करण्यासाठी खाली काढला होता. मात्र, तो तुम्हाला न सांगताच काढल्याने ती घाबरली होती आणि त्यामुळे तिने याबद्दल कुणाला काही सांगितलं नाही.’ मात्र, आता सायलीवर न रागवता पूर्णा आजी तिचं कौतुक करते. त्या फोटोची तू इतकी काळजी घेतेस, तर मी तुझ्यावर का रागवेन?, असं म्हणत पूर्णा आजी सायलीला माफ करते.
दुसरीकडे, रविराज किल्लेदारांच्या घरी पोलीस आले असून, ते आता घरात झालेल्या चोरीबद्दल चौकशी करत आहेत. यावेळी सगळ्यांचे चौकशी केल्यानंतर आता पोलीस निघून जाणार आहेत. मात्र, नागराज यामुळे चांगलाच भेदरला आहे. वहिनीचे दागिने महिपतकडून घेऊन यायलाच हवे, असे म्हणत तो आता पुढचं प्लॅनिंग करणार आहे. दुसरीकडे, सायली आता कोणालाही न सांगता बाहेर निघून गेली आहे. आपल्याला येण्यास उशीर होईल, इतकंच सांगून ती निघाली आहे. सायली त्याच रस्त्यावर पुन्हा जाऊन प्रतिमा आत्यांना शोधत आहे. भरपूर पाऊस कोसळत असल्याने सगळ्यांना सायलीची खूप काळजी वाटत आहे.
सायली नेमकी कुठे गेली सायलीला शोधण्यासाठी आता अर्जुन बाहेर पडणारच होता की, इतक्यात त्याच्या कानावर सायलीचा आवाज पडतो. सायली दारात उभी राहून म्हणते की, ‘मी घरी आले आहे. मात्र मी एकटी आले नाही. माझ्यासोबत यांना देखील घेऊन आले आहे.’ सायली हे बोलताच तिच्या मागून प्रतिमा आत्या पुढे येणार आहेत. डोळ्यात भीती, चेहऱ्यावर डाग आणि डोक्यावर ओढणी अशा अवस्थेत प्रतिमा सायलीच्या मागून पुढे येणार आहे. मात्र, प्रतिमाला बघताच पूर्णा आजी लगेचच आपल्या मुलीला ओळखणार आहेत. आता प्रतिमा आत्यांना सायली घरी घेऊन आल्यामुळे सगळेच आनंदात असणार आहेत. मालिकेच्या येत्या भागातील धमाकेदार कथानक पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या