Tharala Tar Mag 25 January 2024 Serial Update: सायली आणि अर्जुन यांच्या हनिमून ट्रीपची सुरुवात होणार आहे. या हनिमून ट्रीपमुळे सायली आणि अर्जुन यांच्या नात्याला एक वेगळं वळण मिळणार आहे. त्यांच्या नात्यात आता खरेपणा येऊ लागणार आहे. नुकतीच त्यांच्या हनिमून ट्रीपची सुरुवात झाली आहे. ही जोडी हनिमून ट्रीपसाठी माथेरानला गेली आहे. आता माथेरानच्या गुलाबी थंडीत त्यांच्यातील रोमँटिक क्षण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. यावेळी अर्जुन सायलीला खास सरप्राईज देणार आहे. तर, हे सरप्राईज सायली खूप खुश होणार आहे.
सायली आणि अर्जुन दोघेही आता माथेरानला पोहोचले आहेत. यावेळी अर्जुन स्वतः सायलीला घोड्यावर बसवून माथेरानची सफर घडवणार आहे. आता सायलीला घोड्यावर बसवण्यासाठी स्वतः अर्जुन खाली वाकणार आहे. अर्जुनच्या खांद्यावर पाय ठेवून घोड्यावर चढून बसणार आहे. त्यांच्यातील हा रोमँटिक क्षण खूपच खास असणार आहे. सायलीला घोड्यावर बसवून, अर्जुन स्वतः मात्र माथेरानची पायी चालून सफर करणार आहे. अशावेळी सायली आणि अर्जुनच्या सानिध्यात माथेरानचं वातावरण देखील रोमँटिक होऊन जाणार आहे.
यावेळी निसर्गरम्य परिसराचा आनंद घेत असताना सायली पाय घसरून तलावात पडणार, इतक्यात अर्जुन तिचा हात पकडून तिला वाचवणार आहे. दोघेही माथेरानमध्ये खूप धमाल करणार आहेत. मात्र, या खास क्षणांदरम्यान खोटी तन्वी अर्थात प्रिया देखील त्यांच्या मागोमाग माथेरानला पोहोचली आहे. प्रिया आता अर्जुनला मिळवण्यासाठी सायलीचा जीव धोक्यात टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. आता प्रिया दोघांच्या आयुष्यात काय वादळ घेऊन येते हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.
सायली आणि अर्जुन आता त्यांच्या खोट्या हनिमूनसाठी रवाना झाले आहेत. कल्पना सुभेदार यांच्या हट्टामुळे सायली आणि अर्जुन यांना नाईलाजस्तव हनिमूनला जावंच लागलं आहे. मात्र, या प्रवासात देखील त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. अर्जुन आणि सायलीने ही ट्रीप अर्ध्यावर सोडू नये म्हणून, त्यांच्यासोबत चैतन्य पाठवण्यात आलं होतं. तर, आता चैतन्य देखील त्यांना सोडून परतला आहे. माथेरानच्या गुलाबी थंडीत ते आपल्या आयुष्यातील खास रोमँटिक क्षण अनुभवणार आहेत.
संबंधित बातम्या