Tharala Tar Mag 24 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात एक अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. आता अर्जुन सायलीला आपल्या मनातील भावना सांगून टाकणार आहे. मात्र, सायली खूश होण्याऐवजी अर्जुनवर चिडणार आहे. इतकंच नाही तर, तिथून रागाने निघून देखील जाणार आहे. हे बघून आता सगळ्यांनाच धक्का बसणार आहे. मात्र, हे केवळ एक स्वप्न असल्याचं अर्जुनला कळणार आहे. इतकं भयानक स्वप्न बघितल्यानंतर आता अर्जुनला सायलीची आणखीनच काळजी वाटू लागणार आहे. सायलीचं बोलणं अर्धवट ऐकल्याने अर्जुनच्या मनात गैरसमज निर्माण झाले आहेत.
अर्जुन जेव्हा आपल्या रूममधून काही पेपर आणण्यासाठी आणि सायलीला पुन्हा एकदा बघण्यासाठी त्याच्या रूमकडे जात असतो तेव्हा त्याची पावलं रूमबाहेर थबकतात. त्यावेळी त्यांच्या रुममध्ये सायलीसोबत कुसुमताई देखील बसलेली असते. यावेळी सायली आणि कुसुमताई यांच्यात काही बोलणं सुरू असतं. अर्जुनला त्यांच्यात काय बोलणं सुरू आहे, हे माहीत नसतं. मात्र, त्याचवेळी दोघांचं बोलण्यातील एक गोष्ट त्यांच्या कानावर पडते. या बोलण्यात सायली म्हणत असते की, मधुभाऊ जेव्हा परत येतील, तेव्हा मी त्यांच्यासोबत आश्रमात निघून जाईन. मात्र, सायलीचं पूर्ण बोलणं ऐकून घेता अर्जुन तिथून निघून जातो.
सायलीचं बोलणं ऐकून अर्जुन मनातून खूप खचून गेला आहे. रात्रीच्यावेळी त्याला नीट झोप देखील लागत नाही. त्याच वेळी त्याला झोप लागताच एक वाईट स्वप्न पडलं. तो स्वप्नात सायली आणि मधुभाऊंना बोलताना बघत असतो. या वेळी सायली मधुभाऊंसोबत आश्रमात परत जायला निघत असते. त्याचवेळी अर्जुन तिथे येऊन सायलीला आपल्या मनातील सगळ्या भावना सांगून टाकतो. मात्र, सायली त्यावेळी त्याच्यावर खूप रागावते. ‘अर्जुन सर, आपल्यात फक्त एक करार झाला होता. आता तर मला तुमच्याशी मैत्रीही नको आहे. कारण, तुम्ही माझ्याबद्दल असा घाणेरडा विचार करताय, हे ऐकून मला आता नकोसं वाटत आहे.’
सायलीचं हे बोलणं ऐकताच अर्जुनला जोरदार धक्का बसतो आणि तो जागा होते. त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की, हे आपलं केवळ एक स्वप्न होतं. मात्र, सायली सोडून जाईल या विचाराने तो पार बिथरून गेला आहे. तो खाली येताच त्याला सायली पर्स घेऊन बाहेर जाताना दिसणार आहे. सायली बाहेर जातेय, हे बघून तो आणखीनच घाबरून गेला आहे.
संबंधित बातम्या