Tharala Tar Mag 24 June 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत सध्या धक्कादायक कथानक पाहायला मिळत आहे. या मालिकेत आता साक्षीने केलेल्या खोट्या आरोपांमुळे अर्जुन आणि चैतन्य चांगलेच अडचणीत आले आहेत. साक्षीचे आरोप खोटे असले तरी, ते सिद्ध करण्यापूर्वीच कोर्टाने अर्जुन आणि चैतन्यच्या कामावर रोक लावल्याने त्यांची कोंडी झाली आहे. तर, दुसरीकडे हीच संधी साधून आता साक्षीने कोर्टाकडून तातडीची सुनावणी मागून घेतली आणि याच खोट्या आरोपांच्या आधारावर महिपत शिखरे याला कोर्टातून जामीन मिळवून घेतला आहे. यामुळे आता अर्जुनची अधिकच चिडचिड होणार आहे.
साक्षीने महिपतची केस आता रविराजकडून घेऊन पवार नावाच्या वकीलाकडे सुपूर्द केली आहे. या केससाठी अर्जुन कोर्टात जात असताना, आता त्याला कोर्टाच्या दरवाज्यावरच अडवलं जाणार आहे. सुभेदार तुम्हाला कोर्टात येण्याची परवानगी नाही, असं शिपायाने सांगितल्यावर साक्षी आणि महिपत यांनी देखील अर्जुनची खिल्ली उडवली. त्यामुळे अर्जुन चांगलाच संतापला आहे. त्याचवेळी अर्जुनने या आधी मात दिलेल्या एका वकिलाने ‘तुझी सनद रद्द होणार’ असं म्हणत त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केल्यामुळे अर्जुनचा आपल्या रागावरचा ताबा सुटला आहे. यावेळी तो हाणामारी करणार आहे.
आता अर्जुन आणि चैतन्य यांच्या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. साक्षीने केलेल्या आरोपांनंतर आता बार काऊंसिल अर्जुन आणि चैतन्य यांच्यावर चौकशी करण्यासाठी समिती बसवणार आहे. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांची वकिली रद्द करण्यात येणार आहे. या सुनावणी समितीत रविराज किल्लेदार देखील असणार आहेत. त्यामुळे ते स्वतः अर्जुन आणि चैतन्य यांना निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, इथे काऊंसिलमध्ये असलेले इतर वकील अर्जुन आणि चैतन्य यांच्यावरील आरोप कसे खरे ठरतील, याचे प्रयत्न करत आहेत. हीच गोष्ट आता अर्जुनच्या लक्षात आली आहे.
बार काऊंसिलच्या पुढ्यात आता पुन्हा एकदा अर्जुन संतापताना दिसणार आहे. मात्र, यावेळी चैतन्य त्याला शांत करणार आहे. बार काऊंसिलने दोघांनाही स्वतःवरील आरोप खोडून काढण्याची एक संधी दिली आहे. यानंतर सगळेच घरी परतणार आहे. मात्र, घरी परतलेल्या सुभेदारांना आता मोठा झटका बसणार आहे. अर्जुनची वकिली रद्द होऊ नये म्हणून, चैतन्यने सगळे आरोप आता स्वतःवर घेतले आहेत. आपण या सगळ्याला जबाबदार असून, यात अर्जुन सुभेदार याचा काहीही संबंध नसल्याचे चैतन्यने पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे. त्यामुळे आता सगळ्यांनाच धक्का बसणार आहे.
संबंधित बातम्या