Tharala Tar Mag 24 January 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या कथानकात आता गंमतीशीर वळण बघायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन आता त्यांच्या खोट्या पण रोमँटिक हनिमूनसाठी रवाना झाले आहे. आई कल्पना सुभेदार यांच्या हट्टामुळे सायली आणि अर्जुन यांना नाईलाजस्तव हनिमूनला जावंच लागलं आहे. मात्र, या प्रवासात देखील त्यांना वेगवेगळ्या गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. अर्जुन आणि सायलीने ही ट्रीप अर्ध्यावर सोडू नये म्हणून, त्यांच्यासोबत चैतन्य देखील जाणार आहे. सायली आणि अर्जुन यांना माथेरानला सोडून येण्याची जबाबदारी चैतन्य यांच्यावर सोपवण्यात आली आहे. मात्र, आता कुसुम ताईंना देखील या हनिमून ट्रीपबद्दल कळणार आहे.
सायली आणि अर्जुन यांचं हे नातं खरं नाही, याची कल्पना कुसुम ताईंना आधीपासूनच होती. आता सायली आणि अर्जुन हनिमूनला जाण्यासाठी बाहेर पडल्यावर अचानक कुसुम ताई तिथे येऊन धडकल्या आहेत. सायलीकडे काहिअतरी काम असल्याने कुसुम ताई सुभेदारांच्या घरी पोहोचल्या होत्या. बराच वेळ घरात सायली न दिसल्याने त्यांनी कल्पना सुभेदारांकडे याबद्दल विचारणा केली. त्यावेळी सायली आणि अर्जुन हनिमूनसाठी गेल्याचं कल्पनाने त्यांना सांगितलं. मात्र, हे ऐकल्यावर आता कुसुम ताईंना खूप राग आला आहे. कुसुम ताई तडक सुभेदारांच्या घरातून बाहेर पडून सायलीला फोन करणार आहे.
यावेळी त्या चिडलेल्या स्वरातच सायलीचा समाचार घेणार आहेत. सायलीला फोन केल्यानंतर त्या तिला कुठे आणि का चाललात विचारून चांगलंच झापणार आहेत. तुमचा हनिमून कसा होतो तेच मी बघते, अशी धमकी कुसुम ताई सायलीला देणार आहेत. मात्र, कुसुम ताई हे बोलत असतानाच मागून कल्पना सुभेदार त्यांना मोठ्याने आवाज देणार आहेत. आता कल्पना सुभेदारांनी कुसुम ताईंचं हे बोलणं ऐकलं असावं का? त्यांना आता याबद्दल प्रश्न पडले असावेत का? हे मालिकेच्या येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
सायली आणि अर्जुन हनिमूनसाठी रवाना झाले आहेत. माथेरानच्या गुलाबी थंडीत ते आपल्या आयुष्यातील हे रोमँटिक क्षण अनुभवणार आहेत. त्यांचं लग्न जरी खरं नसलं, तरी त्यांच्या आयुष्यातील एकमेकांची साथ ही मनापासूनची आहे. लग्नाचा करार असला तरी, अर्जुन सायलीच्या प्रेमात पडला आहे. आता सायली खरा पती म्हणून अर्जुनचा स्वीकार करेल का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.