Tharala Tar Mag 23rd October 2023 Serial Update: 'ठरलं तर मग' या मालिकेत आता प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. एकीकडे प्रेक्षक लव्ह ट्रॅकची वाट पाहत असताना आता सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसणार आहे. अर्जुन आणि सायली एकमेकांच्या जवळ येण्याऐवजी आता एकमेकांपासून दुरावणार आहेत. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. या मालिकेत आता सायलीवर हल्ला करणाऱ्या अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. पोलीस आणि अर्जुन या हल्लेखोरांच्या तपासासाठी सगळ्या यंत्रणासोबत कामाला लागले आहेत. यात आता हल्लेखोरांचा शोध घेतला जाणार आहे. मात्र, त्याचवेळी कथेत ट्विस्ट येणार आहे.
सायली आता अर्जुनला पुन्हा एकदा दुखावणार आहे. एकीकडे सायलीवर हल्ला कुणी केला या विचाराने अर्जुन चिंतेत आहे. तर, सायली मात्र वेगळाच विचार करत आहे. 'आपलं अर्जुनशी काहीच नातं नाही. परंतु, त्यांच्यामुळे आपल्यावर हल्ला झाला असावा, यामुळे त्यांना वाईट वाटत आहे', असे सायलीला वाटत आहे. मात्र, अर्जुन सायलीवर असलेल्या प्रेमापोटी काळजीत आहे. तर, सायलीला अर्जुनचं प्रेम कळतच नाहीये. आता टी पुन्हा एकदा नकळत अर्जुनला दुखावणार आहे. यावेळी सायली त्याला कराराची आठवण देखील करून देणार आहे.
सायली अर्जुनचा चिंताग्रस्त चेहरा पाहून त्याला समाजावणीच्या सुरात काही सांगताना दिसणार आहे. सायली अर्जुनला म्हणणार आहे की, 'मी तुमची कुणीही नसताना तुमच्यामुळे मला त्रास होतेय असं वाटून तुम्ही चिंतेत पडला आहेत. पण, आता आपण केवळ पाच महिने एकत्र असणार आहोत. त्यानंतर आपले मार्ग वेगळे होतील. तेव्हा तुम्ही उगाच वाईट वाटून घेऊन नका.' सायलीचं हे बोलणं ऐकून आता अर्जुनच्या जीवाचं पाणी होणार आहे. तर, त्याला वाईटही वाटणार आहे.
सायली आणि अर्जुन यांच्या लग्नाचा करार आता संपत आला आहे. त्यानंतर आता दोघेही वेगळे होणार आहेत. सायलीने केवळ मधुभाऊंच्या केससाठी अर्जुनशी लग्न केले होते. तर, अर्जुनने देखील एक करार करण्यासाठी सायलीशी लग्न केले होते. सायलीला आपल्या कराराची पक्की आठवण आहे. तर, अर्जुन मात्र करार विसरून सायलीच्या प्रेमात पडला आहे.
संबंधित बातम्या