मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अर्जुन आणि सायली महिपतला शिक्षा घडवणार! आतातरी तरी तिला सुभेदारांच्या सुनेचा दर्जा मिळणार?

अर्जुन आणि सायली महिपतला शिक्षा घडवणार! आतातरी तरी तिला सुभेदारांच्या सुनेचा दर्जा मिळणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 23, 2024 04:43 PM IST

कोर्टाने महिपतला अतिशय कठोर शिक्षा सुनावली असून, सायली आणि अर्जुन यांच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा अविर्भावही दिसला आहे.

अर्जुन आणि सायली महिपतला शिक्षा घडवणार! आतातरी तरी तिला सुभेदारांच्या सुनेचा दर्जा मिळणार?
अर्जुन आणि सायली महिपतला शिक्षा घडवणार! आतातरी तरी तिला सुभेदारांच्या सुनेचा दर्जा मिळणार?

ठरलं तर मग’ या मालिकेत आता अतिशय रंजक आणि निर्णायक वळण येणार आहे. नुकताच या मालिकेचा एक दमदार प्रोमो समोर आला असून. या प्रोमो व्हिडीओमध्ये महिपतला कोर्ट शिक्षा सुनावताना दिसलं आहे. कोर्टाने महिपतला अतिशय कठोर शिक्षा सुनावली असून, सायली आणि अर्जुन यांच्या चेहऱ्यावर जिंकल्याचा अविर्भावही दिसला आहे. याचाच अर्थ आता महिपत आणि साक्षी यांना त्यांच्या सगळ्या चुकांची शिक्षा भोगावी लागणार आहे. तर, अर्जुन आणि सायली त्यांच्या या मिशनमध्ये यशस्वी ठरणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सुभेदारांच्या घरात सतत संकटं दार ठोठावत होती. कधी प्रतापच्या गाडीत ड्रग्ज, तर कधी सायलीचे किडनॅपिंग, तर कधी चैतन्य आणि अर्जुन यांच्यामध्ये वाद... एकामागे एक अशा अनेक वाईट गोष्टी घडतच होत्या. मात्र, आता या मालिकेत एक सुखद वळण येणार आहे. मालिकेच्या नव्याने रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये कोर्ट रूम मधील वातावरण पाहायला मिळत आहे. यावेळी अर्जुन महिपत विरोधातील सगळे पुरावे कोर्टात हजर करणार आहे. तर, हे सगळे पुरावे मान्य करून कोर्ट महिपत आणि साक्षी यांना कठोर शिक्षा देणार आहे. यामुळे सायली आणि अर्जुन यांनाही आनंद होणार आहे.

‘सायली’ने पुन्हा मारली बाजी, आर ‘अरुंधती’ यावेळीही आऊट! पाहा या आठवड्याच्या ‘टॉप ५’ मराठी मालिका

सायलीचं कौतुक होणार

तर, इतक्या दिवसांपासून सुभेदारांच्या घरात सुरू असलेला वादही आता थोडासा शमतांना दिसणार आहे. सायलीचे सून म्हणून घरात येणे पूर्णा आजीला आधीच पटले नव्हते. त्यात ड्रग्स प्रकरणात महिपतने केलेल्या खोटेपणामुळे प्रताप सुभेदारांच्या डोळ्यात देखील सायलीचे स्थान खाली गेलो होते. मात्र, सगळं सत्य समोर आल्यानंतर आता ‘हीच मुलगी सुभेदारांची सून होण्यास पात्र आहे’, असं म्हणत प्रताप सुभेदार सायलीचा कौतुक करणार आहेत. त्यामुळे आता सायलीला सुभेदारांच्या घरात सुनेचा मान मिळणार का, असा प्रश्न पडत आहे.

बॉलिवूडच्या ‘या’ क्लासिक गाण्यांशिवाय अधुराच आहे होळीचा सण! तुम्ही बनवलीत का स्पेशल प्लेलिस्ट?

सायली आणि अर्जुन येतील का जवळ?

पूर्णा आजी आणि प्रताप यांनी नेहमीच सायलीचा दुस्वास केला होता. सायली आपल्या घराची सून होण्यासाठी अजिबात पात्र नाही, ती घरात आल्यापासूनच या गोष्टी घडत आहेत, असं त्यांचं मत बनलं होतं. मात्र, आता सत्य समोर आल्यानंतर त्यांच्या मनातील या सगळ्या चुकीच्या समजुती पूर्णपणे निघून गेल्या आहेत. त्यामुळे आता सायली आणि अर्जुन यांच्या मार्गातील एवढा मोठा अडथळा दूर होणार आहे. सायली आणि अर्जुन आता एकमेकांना आपल्या मनातील भावना सांगू शकतील का आणि त्यांच्यातील हे प्रेम आणि लग्नाचं नातं एका खऱ्या वळणावर येईल का? हे मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point