मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सायली घर सोडून गेल्याच्या धक्क्याने अर्जुन पडला बेशुद्ध! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये आज काय घडणार?

सायली घर सोडून गेल्याच्या धक्क्याने अर्जुन पडला बेशुद्ध! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये आज काय घडणार?

May 23, 2024 01:51 PM IST

सकाळ झाल्यावर अर्जुन उठतो. मात्र, त्याला त्याच्या बाजूला सायली दिसत नसल्याने तो कावराबावरा होतो. आपल्या रूममध्ये सायलीला शोधत असताना त्याला सायलीची चिठ्ठी सापडते.

सायली घर सोडून गेल्याच्या धक्क्याने अर्जुन पडला बेशुद्ध!
सायली घर सोडून गेल्याच्या धक्क्याने अर्जुन पडला बेशुद्ध!

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात सायली अर्जुन झोपलेला असताना घर सोडून जाताना दिसणार आहे. सुभेदारांचं घर सोडून जात असताना सायलीला सगळ्यांच्या आठवणी मनाशी बांधून घ्यायचं ठरवून घरातून बाहेर पडत असताना सगळ्या वस्तूंना हात लावून, सगळ्या कुटुंबीयांना बघून गुपचूप आपली बॅग उचलून कुणालाही आवाज येणार नाही, अशा दबक्या पावलांनी घराबाहेर पडते. अंगणातून बाहेर जात असताना सायलीला आपलं बालपण देखील जाणवत असतं. मात्र, ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि आपल्या मनात सगळ्या आठवणी साठवून, इथे पुन्हा परतायचं नाही असं म्हणत सुभेदारांच्या घरातून बाहेर पडते.

ट्रेंडिंग न्यूज

दुसरीकडे, सकाळ झाल्यावर अर्जुन उठतो. मात्र, त्याला त्याच्या बाजूला सायली दिसत नसल्याने तो कावराबावरा होतो. आपल्या रूममध्ये सायलीला शोधत असताना त्याला सायलीची चिठ्ठी सापडते. आपल्या मनातील सगळ्या भावना लिहिलेल्या असतात. ‘आपल्याला कुणालाही दुखवायचं नव्हतं. कुणालाही वाईट वाटू द्यायचं नव्हतं. म्हणूनच रात्री सगळे झोपलेले असताना आपण हे घर सोडून जातोय. तुम्ही तुमची काळजी घ्या आणि घरातील सगळ्यांची काळजी घ्या आणि मला शोधायचा प्रयत्न करू नका’, असं सायलीने तिच्या चिठ्ठीत लिहून ठेवलेलं असतं. ही चिठ्ठी वाचल्यावर सायली खरंच घर सोडून निघून गेली, या विचाराने अर्जुनची शुद्ध हरपते आणि तो बेशुद्ध होऊन तिथेच पडतो.

उष्माघातामुळं तब्येत बिघडलेला शाहरुख खान झाला फिट! अहमदाबादच्या रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

अर्जुनला येणार चक्कर

दुसरीकडे, अर्जुन अजून खाली का आला नाही, म्हणून विमल आणि कल्पना त्याला आवाज देण्यासाठी त्याच्या रूममध्ये जातात. तेव्हा अर्जुन तिथे चक्कर येऊन बेशुद्ध पडलेला दिसतो. अर्जुनला अशा अवस्थेत बघून सगळेच घाबरून जातात. यातच सायली घरात कुठेच दिसत नसल्याने सगळेच गोंधळून गेलेले असतात. ग्लानीतही अर्जुन सायलीचे नाव घेत असतो. त्याला सडकून ताप देखील येतो. यावेळी अश्विन अर्जुनला तपासतो आणि तासाभरात त्याचा ताप उतरला नाही, तर आपल्याला त्याला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल, असे म्हणतो.

सायली परत येणार!

दुसरीकडे, सगळेजण आता सायलीला फोन लावायचा प्रयत्न करतात. मात्र, सायली कुणाचाही फोन उचलत नाही. परंतु, विमल देखील फोन लावणे थांबवत नाही. विमल ताई इतक्या वेळा फोन करते हे बघून सायली एकदा फोन उचलते. त्यावेळेस विमल तिला अर्जुनच्या तब्येतीबद्दल सांगते. अर्जुनची तब्येत बिघडली आहे हे कळतात घर सोडून जायला निघालेली सायली अर्ध्या वाटेतूनच सुभेदारांच्या घरी परत येते. अर्जुनला अशा अवस्थेत पाहून सायली देखील घाबरून आजारी पडते. मात्र, त्यावेळी कल्पना आणि अश्विन तिला सावरतात. अर्जुनला लवकरच बरं वाटेल, असं म्हणून सायलीला तू कुठे गेली होतीस?, असा प्रश्न विचारतात. मात्र, सायली कुणालाही उत्तर देत नाही.

टी-२० वर्ल्डकप २०२४