Tharala Tar Mag : अर्जुनच्या खेळीमुळे महिपतच्या गोटात फूट; प्रियाला खावा लागणार मार! आजच्या भागात काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag : अर्जुनच्या खेळीमुळे महिपतच्या गोटात फूट; प्रियाला खावा लागणार मार! आजच्या भागात काय घडणार?

Tharala Tar Mag : अर्जुनच्या खेळीमुळे महिपतच्या गोटात फूट; प्रियाला खावा लागणार मार! आजच्या भागात काय घडणार?

Published Oct 22, 2024 01:55 PM IST

Tharala Tar Mag 22 October 2024 Serial Update: महिपतच्या माणसांनी आश्रमाच्या एक बाजूने तोडण्यास सुरुवात केली होती. आश्रमाचा थोडासा भाग तुटतच होता, इतक्यात अर्जुनची तिथे हिरोसारखी इंट्री झाली.

Tharala Tar Mag 22 October 2024
Tharala Tar Mag 22 October 2024

Tharala Tar Mag 22 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आज एक धमाकेदार वळण पाहायला मिळणार आहे. जजला पैसे देऊन निर्णय आपल्या बाजूने लावून घेतल्यानंतर महिपत आणि साक्षी दोघेही बुलडोझर आणि काही माणसं घेऊन आश्रम पाडण्यासाठी त्या ठिकाणी पोहोचले होते. तर, आपल्या घराला शेवटचं एकदा डोळे भरून बघता यावं म्हणून सायली आणि कुसुम ताई देखील आश्रमाजवळ पोहोचल्या होत्या. त्यावेळी महिपतने आश्रमाचे तोड काम सुरू केलं होतं. सायलीने त्याला अनेक प्रकारे विनवणी केली की, ‘आमचं घर तोडू नका’. मात्र, महिपतने तिचं काहीही ऐकून घेतलं नाही.

महिपतच्या माणसांनी आश्रमाच्या एक बाजूने तोडण्यास सुरुवात केली होती. आश्रमाचा थोडासा भाग तुटतच होता, इतक्यात अर्जुनची तिथे हिरोसारखी इंट्री झाली. अर्जुनने येताच महिपतला एक जोरदार धक्का दिला आणि त्याच्या हातातील सगळे पेढे खाली पाडले. इतकंच नाही तर, त्याने तोड काम करणाऱ्या कामगारांना देखील त्यांचं काम थांबवण्याचे आदेश दिले. अर्जुन काम थांबवायला सांगतोय, हे कळतात महिपत त्याच्यावर चिडला. त्यावर अर्जुनने त्याला आपल्याकडे कोर्टाचा नवा निर्णय असल्याचं सांगितलं. मात्र, महिपत यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. अर्जुन चैतन्यकडून कोर्टाची नवीन ऑर्डर घेऊन, ती महिपतच्या हातात टेकवली.

Tharala Tar Mag : अर्जुन शक्कल लढवणार; महिपतचा डाव उधळून लावणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?

महिपतला बसणार धक्का!

कोर्टाची ही ऑर्डर वाचताच महिपतच्या पायाखालची जमीन सरकली. महिपतला आश्रमाचा तोड काम लगेच थांबवावं लागलं. मात्र, हे कसं झालं याची कल्पना त्याला नव्हती. यावर अर्जुनने त्याच्या फोनवरून जजला फोन लावला आणि नेमकं काय काय घडलं, हे त्याला सांगण्यास सांगितलं. यावर जज देखील म्हणाले की, ‘तुमच्यामुळे माझं करिअर उद्ध्वस्त झाले. आता माझ्याकडे सनदही राहिलेली नाही. मी जज काय आता साधा वकील म्हणूनही काम करू शकत नाही. तुमच्यामुळे मी उगाचच या सगळ्यात अडकलो’, असं म्हणून जजने फोन ठेवून दिला. आपल्या सगळ्या योजनेवर पाणी फिरलं, हे कळतात आता महिपत रागाने वेडापिसा झाला आहे.

अर्जुनची खेळी गेम पालटणार

तर, सायली मात्र अर्जुनच्या धाडसी पावलामुळं आनंदून गेली आहे. ‘अर्जुन सरांनी आपलं घर तुटण्यापासून वाचवलं. माझा त्यांच्यावर विश्वास होता. त्यांनी मला वचन दिलं होतं आणि ते वचन त्यांनी पाळलं’, असं म्हणून सायली अर्जुनचे आभार मानते. धावतच घरी जाऊन आता सायली सगळ्यांना आपला आश्रम वाचला आहे ही आनंदाची बातमी सगळ्यांना देणार आहे. तर, तिकडे प्रिया महिपतच्या नावानं खडे फोडणार आहे. ‘मी उगाचच तुमच्या टीममध्ये सामील झाले. ना तुम्हाला आश्रम तोडता आला, ना त्यात जजची केस मॅनेज करता आली. तुमच्यामुळे मीसुद्धा या सगळ्यांमध्ये अडकणार आहे. तुम्हाला डोकं नाही’, असं ती महिपतला म्हणणार आहे. आधीच चिडलेल्या महिपतचं डोकं आता आणखी फिरणार आहे. तो जागेवरून उठून प्रियाच्या कानाखाली आवाज काढणार आहे.

Whats_app_banner