मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  साक्षी विरोधात पुरावे गोळा करण्याची संधी चैतन्यकडे चालून येणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये येणार नवं वळण

साक्षी विरोधात पुरावे गोळा करण्याची संधी चैतन्यकडे चालून येणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये येणार नवं वळण

Harshada Bhirvandekar HT Marathi
May 22, 2024 01:29 PM IST

साक्षी घरातून गायब झाली आहे. साक्षी कुठे गेली आहे? असा प्रश्न चैतन्यला देखील पडला आहे. दुसरीकडे काही लोक साक्षीच्या घरी येऊन पैशाची मागणी करत आहेत.

साक्षी विरोधात पुरावे गोळा करण्याची संधी चैतन्यकडे चालून येणार!
साक्षी विरोधात पुरावे गोळा करण्याची संधी चैतन्यकडे चालून येणार!

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अजूनही सुभेदारांच्या घरात सायली आणि अर्जुन यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला जात आहे. आजच्या दिवशीच सायलीला आहे घर सोडावं लागणार आहे. याचीच रुखरुख तिच्या मनाला लागून राहिली आहे. सुभेदारांचे घर सोडण्यापूर्वी सायली घरातील प्रत्येकाकडे जाऊन त्यांना बघत असते. ती प्रताप आणि कल्पना यांच्या खोलीकडे जाते आणि त्यांच्याकडे कौतुकाने बघत असते. इतक्यात कल्पनाची नजर सायलीकडे जाते आणि कल्पना तिला आत बोलावून घेते. सायली प्रताप आणि कल्पना यांच्या पाया पडते.

ट्रेंडिंग न्यूज

त्यावेळी आशीर्वाद मागून ती म्हटले की, मी पुन्हा कधीच कुणाला दुखावणार नाही. तेव्हा प्रताप तिला आशीर्वाद देतो आणि म्हणतो की, ‘मी तुला आशीर्वाद तर देणारच आहे. पण पुढचे सात जन्म तू माझी सून असावीस, म्हणजे मला तुझ्यावर अशीच माया करता येईल’, असं म्हणतो. आता सायलीला हे ऐकून फार वाईट वाटणार आहे. मनातल्या मनात सायली म्हणणार आहे की, ‘पुढचे सात जन्म काय, मी या जन्मातही तुमची सून होऊ शकणार नाहीये आणि याचं सगळ्यात जास्त दुःख मला वाटतंय.’ मात्र, कल्पना आणि प्रताप सायलीचा तोंड भरून कौतुक करणार आहेत.

अभिनेत्रींचे मागून किंवा चुकीच्या पद्धतीने फोटो काढणं थांबवा! पापाराझींवर संतापला मराठमोळा अभिनेता

साक्षी घरातून पळ काढणार!

दुसरीकडे, साक्षी घरातून गायब झाली आहे. साक्षी कुठे गेली आहे? असा प्रश्न चैतन्यला देखील पडला आहे. दुसरीकडे काही लोक साक्षीच्या घरी येऊन पैशाची मागणी करत आहेत. ही लोक कोण आहेत याची कल्पना चैतन्यला नाही. तो देखील घरभर साक्षीला शोधत आहेत. त्यात ही घरात आलेली माणसं देखील घरात शिरून सगळीकडे जाऊन साक्षीला शोधण्याचा प्रयत्न करतात. तर, चैतन्य त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतो की, साक्षी घरात नाही. इतक्यात चैतन्याला साक्षीचा मेसेज येतो. या मेसेजमध्ये साक्षी त्याला सांगते की, काही इन्वेस्टर घरी आले असतील, ते मला इन्व्हेस्टमेंट साठी सतत त्रास देत आहेत, म्हणून मी दोन दिवसांसाठी हॉटेलमध्ये लपून राहते. तू त्या इन्वेस्टर्स ना घरातून घालव. मला आता त्यांना कुठलीही पैसे द्यायचे नाहीत.

चैतन्यकडे चालून येणार संधी!

मात्र, त्यांच्या घरात शिरलेले लोक चैतन्यला म्हणतात की, ‘या लोकांनी आमचे खूप पैसे घेतलेले आहेत. ते परत नाही केले तर आम्ही यांचे सगळे धंदे उघडकीस आणू’, अशी धमकी देऊन ती माणसं निघून जातात. त्यावेळी चैतन्यच्या मनात येतं की साक्षीचे शत्रू आपले मित्र बनू शकतात. यांच्याकडून आपल्याला साक्षी आणि महिपत विरोधात अनेक पुरावे देखील मिळू शकतात. त्यामुळे त्यांच्याशी हात मिळवणी केली पाहिजे. आता चैतन्य ही चालून आलेली संधी स्वीकारेल का आणि साक्षी विरोधातील पुरावे गोळा करू शकेल का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४