Tharala Tar Mag 22 July 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात रंजक वळण पाहायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन यांच्या प्लॅननुसार अर्जुन अलिबागला गेला होता. तर, प्रियादेखील त्याच्याबरोबर अलिबागमध्ये गेली होती. प्रिया आणि अर्जुन अलिबागमध्ये गेल्यावर अर्जुन तिच्याकडून सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, प्रियाच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. प्रिया अर्जुनला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावून, त्याच्याकडून स्वतःचं उद्दिष्ट साध्य करून घेणार आहे. मात्र, त्याचवेळी तिथे सायली येऊन धडकणार आहे. बराच वेळ अर्जुनने फोनही केलेला नाही आणि मेसेजही केलेला नाही. यामुळे सायली चांगलीच टेन्शनमध्ये आली होती.
प्रियामुळे अर्जुन अडचणी तर, सापडला नाही ना, या विचाराने तिला घरात शांत बसवत नव्हतं. म्हणूनच सायली तडक अलिबागच्या दिशेने निघाली. अर्जुन कुठल्या हॉटेलमध्ये थांबला आहे, हे तिला आधीपासूनच माहीत होते. त्यामुळे तिथे पोहोचतात, तिच्या डोळ्यासमोर तिला जे दृश्य दिसलं, ते पाहून तिला धक्काच बसला. सायली या हॉटेलमध्ये पोहोचली त्यावेळेस प्रिया आणि अर्जुन एकमेकांच्या गळ्यात हात घालून रोमँटिक डान्स करत होते. तर प्रिया त्याला जबरदस्तीने मद्यप्राशन करायला लावत होती. तेवढ्यात अर्जुनचं लक्ष सायलीकडे गेलं आणि तो खाली कोसळला. तर, सायली देखील दोघांना असं बघून रागानं तिथून निघून गेली. सायली बाहेर जाताच अर्जुन देखील तिच्या मागे मागे निघाला.
‘माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही बघितलं ते काही खरं नव्हतं’, असं म्हणत तो तिची मनधरणी करत होता. मात्र, सायली त्याला म्हणाली की, ‘अर्जुन सर मी तुम्हाला इथे प्रियांकडून खरं काय ते जाणून घ्यायला पाठवलं होतं. पण तुम्ही तर तिच्या गळ्यात गळे घालून नाचत होतात’. अर्जुन सायलीची समजूत घालण्यासाठी तिच्या मागे मागे धावत होता, त्याचवेळी सायलीचे लक्ष रस्ता ओलांडणऱ्या एका महिलेकडे गेलं. या महिलेला ट्रक उडवणार इतक्यात सायली तिला पकडून बाजूला ढकलते. त्यावेळी सायलीचे लक्ष त्या महिलेच्या चेहऱ्याकडे गेले. ही महिला दुसरी तिसरी कोणी नसून, प्रतिमा आत्या म्हणजे सायलीची खरी आई होती. मात्र, त्यावेळेस सायलीच्या काहीच लक्षात येत नव्हतं.
घरी आल्यानंतर सायलीचं लक्ष प्रतिमाच्या फोटोकडे गेले. सायलीने तो फोटो खाली काढून, त्या महिलेच्या चेहऱ्यावर जसे डाग होते, तसे डाग त्या फोटोवर देखील काढले आणि त्यावर पांढरी ओढणी गुंडाळली. यानंतर सायलीला आपण पाहिलेली महिला ही प्रतिमा आत्याच होती, याची खात्री पटली. दुसरीकडे, पूर्णा आजी सकाळी उठून प्रतिमाच्या फोटो जवळ गेल्यावर तिला तिला तो फोटो दिसला नाही. त्यामुळे आजी आरडाओरडा करू लागली. आजीने सगळ्यांना बोलावून फोटोबद्दल विचारलं. तर, त्यावेळी सायली अर्जुनला खोलीत नेऊन त्या महिलेबद्दल सांगितलं. मात्र, आता अर्जुन देखील तिच्यावर विश्वास ठेवत नाहीये. आता सायली प्रतिमाला शोधू शकेल का? हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये कळणार आहे.
संबंधित बातम्या