Tharala Tar Mag 22 January 2024 Serial Update: ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आता सायली आणि अर्जुन यांच्या आयुष्यात एक अनपेक्षित वळण आलं आहे. एकीकडे रुसलेली सायली आता अर्जुनमुळे घरी परत आली आहे. तर, अर्जुनच्या आईने आता एक नवी गुगली टाकली आहे. पुन्हा आपली सून रुसून माहेरी जाऊ नये, तिला थोडा आराम मिळावा म्हणून अर्जुनच्या आईने दोघांना सरप्राईज हनिमून तिकीट दिले आहेत. मात्र, हा सायलीसाठी एक मोठा धक्काच होता. दोघांना मिळालेलं हे सरप्राईज दोघांसाठीच आश्चर्याचा धक्का ठरलं. एकीकडे अर्जुन यासाठी खूपच उत्सुक होता. तर, सायली मात्र पुरती बावरून गेली आहे.
अर्जुन सायलीच्या प्रेमात आकंठ बुडाला असला तरी, सायली मात्र अजूनही आपल्या ठरल्या कराराप्रमाणेच वागत आहे. येत्या काहीच दिवसांत दोघांमधील हा लग्नाचा करार संपणार आहे. लग्नाचा करार संपल्यानंतर सायली अर्जुनच्या आयुष्यातून कायमची निघून जाणार आहे. मात्र, त्यांच्यातील या कराराची कल्पना कुणालाही नाही. सुभेदारांच्या घरात मात्र सगळ्यांचाच गोड गैरसमज झाला आहे. सगळ्यांनाच असे वाटत आहे की, अर्जुन आणि सायली यांचा हा प्रेम विवाह आहे. मात्र, अर्जुनने केलेला करार इतर कुणालाही माहित नाही. त्यामुळेच आता सायली गोंधळून गेली आहे.
सायली घरी परतून येताच अर्जुनच्या आईने म्हणजेच कल्पनाने दोघांना हनिमूनची तिकीटं गिफ्ट केली होती. यानंतर अर्जुन आणि सायलीने अनेक बहाणे करून देखील कुणी न ऐकल्याने आता त्यांना नाईलाजास्तव त्यांना जावंच लागणार आहे. दुसरीकडे, सायली अर्जुनपासून लांब राहण्यासाठी अनेक शकला लढवत आहे. मात्र, अर्जुन सायलीचं मन राखण्यासाठी नकार देत असला, तरी त्याला मनातून सायलीसोबत बाहेर जाण्याची इच्छा आहे. आता ती खोटं खोटं का होईना, अर्जुन या हनिमून ट्रीपसाठी खास शॉपिंग करून आला आहे. तर, अर्जुनच्या हातात शॉपिंग बॅग बघून आता सायलीला आणखीनच कुठेतरी लपून राहावं असं वाटू लागलं आहे.
अर्जुन आणि सायली लग्नानंतर पहिल्यांदाच बाहेर जाणार असून, त्यांच्या हनिमूनवरून आता सगळेच त्यांची मस्करी करू लागले आहेत. तर, सायली मात्र मनातून पार घाबरून गेली आहे. सायलीला अर्जुनसोबत हनिमूनला जायचं नसल्याकारणाने ती आता आणखी एक शक्कल लढवणार आहे. यावेळी ती सगळ्यांना सोबत चालण्याचा आग्रह करणार आहे. सगळं बुकिंग झालंच आहे, आपण ते रद्द देखील करू शकत नाही, तर सगळेच सोबत फिरायला जाऊया, असा आग्रह सायली सगळ्यांना करणार आहे. सायलीचं हे बोलणं ऐकून अर्जुनच्या सगळ्या मनीषांवर पाणी फिरणार आहे.