Tharala Tar mag 22 February 2024 Serial Update: चैतन्य आणि अर्जुन यांच्या वादानंतर आता सायलीने ऑफिसमधील चैतन्यची जागा घेतली आहे. आता सायली अर्जुनची मदतनीस म्हणून ऑफिसचं काम पाहणार आहे. मात्र, दुसरीकडे तिला यासाठी घरून परवानगी घ्यावी लागणार आहे. सायली येण्याआधीच पूर्णा आजीने तिला बाहेर जाऊ द्यायचं नाही, असं फर्मान सोडलं आहे. तर, आता सायली घरी आल्यावर कल्पनाकडे ऑफिसला जाण्याची परवानगी मागणार आहे. सायलीचा चेहरा बघून कल्पनाला ऑफिसमध्ये काहीतरी झाल्याचा संशय येणार आहे. मात्र, सायली तिच्यापासून सगळ्या गोष्टी लपवून ठेवणार आहे.
पूर्णा आजीच्या विरोधात जात कल्पनाने सायलीला अर्जुनसोबत ऑफिसला जाण्याची परवानगी दिली आहे. केवळ परवानगीच नाही तर, कल्पनाने त्या तिघांसाठी डबा देखील बनवला होता. सायली, अर्जुनसह कल्पनाने चैतन्यचा डबा देखील भरला होता. मात्र, अर्जुन चैतन्यचा डबा न घेताच ऑफिसला निघून जाणार आहे. यावेळी पुन्हा एकदा कल्पनाला चैतन्य आणि अर्जुनमध्ये वाद झाल्याचा संशय येणार आहे. ती सायलीकडे याबद्दल पुन्हा चौकशी करणार आहे. मात्र, सायली पुन्हा तिच्या प्रश्नांना उडवाउडवीची उत्तरं देणार आहे. आता सायली नव्याने कामाची सुरुवात करणार आहे.
घर आणि ऑफिस दोन्ही व्यवस्थित सांभाळण्यासाठी सायली देवी आईचा आशीर्वाद घेऊन पुढे निघणार आहे. तर, इकडे साक्षी आणि चैतन्य ऑफिसमध्ये येऊन पोहोचणार आहेत. साक्षीला ऑफिसमध्ये पाहून पुन्हा अर्जुनचा पार चढणार आहे. यावेळी पुन्हा एकदा अर्जुन साक्षीला सुनावणार आहे. ‘तू केवळ आश्रमाच्या केससाठी चैतन्यचा वापर करत आहेस. उद्या एखाद्या दुसऱ्या जमिनीचा सौदा करायचा झाल्यास तू आणखी कुणाच्यातरी प्रेमात पडल्याचं नाटक करशील. हे सगळं तूच करू शकतेस. कारण, हे केवळ तुलाच जमू शकतं’. यावेळी अर्जुन आणि चैतन्य यांच्यामध्ये पुन्हा वाद होणार आहे. तर, ‘साक्षीला काहीही बोलू नकोस. साक्षीला बोलण्याची तुझी लायकी नाही’, असे चैतन्य अर्जुनला म्हणणार आहे.
आता चैतन्य अर्जुनने दिलेलं घर सोडून, सगळं सामान घेऊन साक्षीच्या घरी राहायला जाणार आहे. मात्र, चैतन्य घरात राहायला आल्याचे पाहून महिपत वैतागणार आहे. महिपतच्या काळ्या कामांमध्ये चैतन्य अडथळा आणू शकतो, असे त्याला वाटत आहे. मात्र, आता साक्षी आपण मिळून चैतन्यला आपल्या तालावर नाचवू, असं म्हणत महिपतची मनधरणी करणार आहे.