Tharala Tar Mag 22 August 2024 Serial Update: प्रेक्षकांची आवडती मालिका ‘ठरलं तर मग’ आता एका भावनिक वळणावर पोहोचली आहे. या मालिकेत आता प्रतिमा आत्या स्वतःहून एका पाऊल पुढे टाकणार आहे. सुभेदारांच्या कुटुंबात यामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. प्रतिमा आत्या आपल्या कुटुंबात पहिल्यांदाच एकत्र बसण्याचा निर्णय घेणार आहेत. त्यांनी स्वतःहून उचललेलं हे पाऊल आता सगळ्यांसाठीच खूप खास ठरणार आहे. त्यांच्या एका कृतीमुळे सगळेच खूप खूश होणार आहेत. सायलीने प्रतिमा आत्याला शोधून पुन्हा आपल्या घरी परत आणले आहे. आता ती त्यांना त्यांच्या जुन्या आठवणी परत मिळाव्यात म्हणून मदत करत आहे.
सायली प्रतिमा आत्यांना घरात घेऊन आली असली, तरी त्यांच्या आठवणी अजून परत आलेल्या नाहीत. त्यामुळे ती त्यांना हळूहळू सगळ्या आठवणी आठवून देत आहे. तिने तिला शक्य असलेले सगळे प्रयत्न करून पाहिले आहेत. तिच्या या प्रयत्नांना आता हळूहळू यश मिळताना दिसत आहे. आता प्रतिमा आत्या सुभेदारांच्या घरात स्वतःहून रुळताना दिसत आहेत. त्या स्वतःहून या कुटुंबाचा भाग व्हायला बघणार आहेत. या घरात आल्यापासून प्रतिमा आत्या सगळ्यांना घाबरून राहत होत्या. मात्र, आता त्यांच्या मानतील ही भीती आता हळूहळू नाहीशी होत आहे. याच दिशेने त्या आता पहिलं पाऊल उचणार आहे.
नेहमी सायलीच सकाळी प्रतिमा आत्यांना त्यांच्या रूममध्ये जाऊन चहा देते. आजही ती नेहमीप्रमाणे चहा देण्यासाठी त्यांच्या रुममध्ये जाणार होती. मात्र, त्याआधीच प्रतिमा हॉलमध्ये येणार आहे. आज मला माझ्या रूममध्ये चहा नको, मी इथेच सगळ्यांसोबत बसून चहा घेईन, असं प्रतिमा आत्या खुणेने सायलीला सांगणार आहेत. तर, हे ऐकून सायलीला खूप आनंद होणार आहे. प्रतिमा आत्या पहिल्यांदाच सगळ्यांसोबत बसून चहा घेणार आहेत. अगदी याच कुटुंबाचा भाग असल्याप्रमाणे त्या सगळ्यांसोबत बसणार आहेत.
बहीण प्रतिमा या घरात परत आली आहे. पण तिला काही आठवतच नाहीये. अशा परिस्थितीत ती मला राखी बांधेल का?’, असा प्रश्न प्रतापला पडणार आहे. तर, आपल्या सासऱ्यांचं बोलणं ऐकल्यानंतर सायली त्यांना एक छान सरप्राईज देणार आहे. सायली प्रतिमा आत्यांना तयार करून रक्षाबंधनासाठी घेऊन येणार आहे. ‘त्यांना आठवत नाही म्हणून काय झालं? तुम्हाला तर माहित आहे ना की हीच आपली बहीण आहे’, असं सायली बोलणार आहे. तर, सायलीच्या या शब्दांना मान देत प्रतिमा आत्या आपल्या भावाला म्हणजे प्रतापला राखी बांधणार आहे.