मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सायली सुखरूप असल्याचे कळताच महिपत हादरणार; ‘ठरलं तर मग’च्या आजच्या भागात काय घडणार?

सायली सुखरूप असल्याचे कळताच महिपत हादरणार; ‘ठरलं तर मग’च्या आजच्या भागात काय घडणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 21, 2024 05:18 PM IST

सायलीला आपल्यासमोर बघून प्रिया चांगलीच घाबरली आहे. आता प्रिया साक्षीला फोन लावून सगळ्या गोष्टी कशा घडल्या ते सांगणार आहे.

सायली सुखरूप असल्याचे कळताच महिपत हादरणार
सायली सुखरूप असल्याचे कळताच महिपत हादरणार

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात महिपतला सायली सुखरूप असल्याचा कळणार आहे. एवढे प्लॅनिंग करून सुद्धा सायली वाचली, हे कळल्यानंतर महिपतला मोठा धक्का बसणार आहे. सायली घरी आल्यापासून अर्जुन तिची खूपच काळजी घेत आहे. आपण न सांगताय अर्जुनला कसं कळलं की, आपल्याला महिपतनेच किडनॅप केलंय, असा प्रश्न सायलीला पडला आहे आणि आता तो ती अर्जुनला विचारणार आहे. तुम्हाला सगळ्या गोष्टी माहित असून सुद्धा तुम्ही मी मंदिराच्या मागे बेशुद्ध पडले होते, असं खोटं का सांगितलं? याबद्दल देखील ती अर्जुनला विचारणार आहे.

सायलीच्या प्रश्नांना उत्तर देताना अर्जुन तिला सांगणार आहे की, ‘मला माहीत होतं तुम्हाला गायब करण्यामागे महिपतचाच हात असणार. पण, आता जर मी महिपतच्या विरोधात काहीही बोललो, तर पूर्णा आजी आणि बाबा यावर विश्वास ठेवणार नाहीत आणि पुन्हा एकदा तुम्हाला काहीतरी गोष्टी सुनावल्या जातील. याशिवाय आपल्या घरातील अशा काही व्यक्ती आहेत, ज्या महिपतला या सगळ्यात मदत करत आहेत. जर मी आता काही बोललो असतो, तर त्या सगळ्या गोष्टी लगेच महिपतपर्यंत पोहोचल्या असत्या. त्यामुळे इथून पुढे आपल्याला फार विचार करून पुढची चाल आखावी लागणार आहे. त्यामुळे आता सगळ्यांना असंच दाखवत राहायचं की, तुम्ही मंदिराच्या मागे बेशुद्ध पडला होतात.’

‘स्वातंत्र्यवीर सावरकर’मध्ये मराठीतील ‘हा’ अभिनेता साकारतोय सुभाषचंद्र बोस! लूक पाहून ओळखलं का?

प्रिया साक्षी-महिपतला सायलीबद्दल सांगणार

सायलीला आपल्यासमोर बघून प्रिया चांगलीच घाबरली आहे. आता प्रिया साक्षीला फोन लावून सगळ्या गोष्टी कशा घडल्या ते सांगणार आहे. सायली घरी सुखरूप आल्याचे ऐकून साक्षी आणि महिपतला मोठा धक्का बसला आहे. आपण एवढे प्लॅनिंग करून, एवढा कडेकोट बंदोबस्त करून देखील सायली आपल्या माणसांच्या तावडीतून सुटली कशी, असा प्रश्न महिपतला पडला आहे. प्रिया फोनवर घडलेला सगळा प्रकार साक्षीला सांगणार आहे. अर्जुनने मंदिराच्या मागे बेशुद्ध पडलेल्या सायलीला घरी कसं आणलं, हे देखील प्रिया साक्षीला सांगणार आहे.

लग्न न करताच आई झालेली बॉलिवूडची ‘ही’ अभिनेत्री पोहोचली कोकणात; बॉयफ्रेंडसोबत करतेय धमाल!

सायलीने सांभाळून ठेवला पुराव्यांचा पेनड्राईव्ह

दुसरीकडे, अर्जुनच्या प्रेमाला आता उधाण आले आहे. सायली घरी आल्यापासून अर्जुन तिची खूपच काळजी घेत आहे. थकलेल्या सायलीला बघून, तो तिचे पाय दाबून देतो आणि ही घटना नेमकी कशी घडली हे सगळं जाणून घेण्यासाठी काही प्रश्न सायलीला विचारतो. त्यावेळी सायली अर्जुनला घडलेली सगळी घटना सांगते, तसेच संतोषने महिपत विरोधातील सगळे पुरावे आपल्याला दिले आहेत असे देखील ती अर्जुनला सांगते. आता या सगळ्या गडबडीत सायलीने स्वतःच हुशारी दाखवत, संतोषने दिलेला पुराव्यांचा पेनड्राईव्ह गाडीत लपवून ठेवला आहे, हे कळतात अर्जुनला आपल्या बायकोचा अभिमान वाटतो.

WhatsApp channel