Tharala Tar Mag : अर्जुन शक्कल लढवणार; महिपतचा डाव उधळून लावणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?
मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag : अर्जुन शक्कल लढवणार; महिपतचा डाव उधळून लावणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?

Tharala Tar Mag : अर्जुन शक्कल लढवणार; महिपतचा डाव उधळून लावणार! ‘ठरलं तर मग’ मालिकेत आज काय घडणार?

Oct 21, 2024 02:28 PM IST

Tharala Tar Mag 21 October 2024 Serial Update : कोर्टात युक्तिवाद सुरू असताना सगळे पुरावे जळून गेल्याचे समजताच जजने आपला निर्णय पक्का करून टाकला होता.

Tharala Tar Mag 21 October 2024
Tharala Tar Mag 21 October 2024

Tharala Tar Mag 21 October 2024 Serial Update : ‘ठरलं तर मग’ या मालिकेत आज प्रेक्षकांना खेळ पालटताना पाहायला मिळणार आहे. आश्रमाच्या केसमध्ये आता एक मोठा ट्वीस्ट येणार आहे. महिपत आणि साक्षी शिखरे यांनी पैसे देऊन जजला देखील विकत घेतले होते. त्यामुळे कोर्टात अनेक गोष्टी सिद्ध करून देखील जजने महिपतच्या बाजूने निर्णय देत सायली आणि मधुभाऊंचा ‘वात्सल्य आश्रम’ जमीनदोस्त करण्याचा निर्णय दिला आहे. या जमिनीचे मालक महिपत शिखरे असून, ती त्यांच्या ताब्यात देऊन पुढील काम सुरू करण्यास कोर्ट परवानगी देत असल्याचा निर्णय जजने दिला आहे. मात्र, आता अर्जुन आपली शक्कल लढवून महिपतची ही खेळी उधळून लावणार आहे.

कोर्टात युक्तिवाद सुरू असताना सगळे पुरावे जळून गेल्याचे समजताच जजने आपला निर्णय पक्का करून टाकला होता. मात्र, अर्जुनकडे एक मोठा आणि महत्त्वाचा पुरावा आहे, तो सोन्याचा तुकडा कोर्टाला का दाखवत नाहीये, असा प्रश्न सायलीला पडला होता. कोर्टात निर्णय आपल्या विरोधात येत असताना देखील अर्जुन गप्प बसलाय, हे पाहिल्यानंतर कुसुम ताईदेखील खूप चिडली होती. जजचा निर्णय ऐकल्यानंतर सायली अर्जुनवर देखील चिडली आहे. मात्र, अर्जुनने असं का केलं, आश्रम का तुटू दिला या विचाराने ती गोंधळून गेली आहे. यातच आता त्यांना काहीही पर्याय नसल्याने कोर्टातून निघावं लागणार आहे. त्याचवेळी अर्जुनचं लक्ष महिपत, जज आणि साक्षी यांच्याकडे जाणार आहे.

Tharala Tar Mag : सायली-अर्जुनच्या हाती पुरावा तर लागला, पण साक्षीचं पुढे काय होणार? ‘ठरलं तर मग’मध्ये काय घडणार?

महिपतचा डाव उघड होणार!

यावेळी अर्जुन गुपचूप त्यांच्याजवळ जाऊन त्यांचं बोलणं ऐकणार आहे. त्यांच्या बोलण्यातून अर्जुनला हे कळतं की, महिपत आणि साक्षीने जजला भरपूर पैसे देऊ केले आहेत. यासोबतच आज जजसाठी एक पार्टी देखील ठेवण्यात आली आहे. आता हे ऐकून अर्जुनच्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन येतो. घरी आल्यावर आता अर्जुन चैतन्यला काळे कपडे आणि मास्क घालून तयार व्हायला सांगणार आहे. अर्जुनच्या या वागण्यामुळे चैतन्य देखील गोंधळून जाणार आहे. मात्र, तो अर्जुनसोबत गेल्यावर त्याला सगळा प्लॅन कळणार आहे. अर्जुन आणि चैतन्य मिळून जजचे काळेधंदे मोबाईलमध्ये रेकॉर्ड करणार आहेत.

अर्जुनला यश मिळणार!

जजचे हे व्हिडीओ घेऊन आता अर्जुन कोर्टात मिटिंग बोलावणार आहे. बार काऊन्सिललसमोर अर्जुन हे सगळे व्हिडीओ सादर करणार असून, यामुळे जजला आता निलंबित करण्यात येणार आहे. यासोबतच पुन्हा एकदा वात्सल्य आश्रमाच्या तोडकामावर स्टे आणण्याचा निर्णय दिला जाणार आहे. यामुळे सायलीचा आश्रम वाचवण्याची आणखी एक संधी अर्जुनला मिळणार आहे.  

Whats_app_banner