मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  सायली अर्जुनचं घर सोडून निघून जाणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये येणार धक्कादायक वळण

सायली अर्जुनचं घर सोडून निघून जाणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये येणार धक्कादायक वळण

May 21, 2024 12:11 PM IST

सायली अर्जुनचे घर सोडून निघून जाण्याचा विचार करणार आहे. मात्र, अर्जुन वेळोवेळी सायलीला अडवायचा प्रयत्न करत आहे.

सायली अर्जुनचं घर सोडून निघून जाणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये येणार धक्कादायक वळण
सायली अर्जुनचं घर सोडून निघून जाणार? ‘ठरलं तर मग’ मालिकेमध्ये येणार धक्कादायक वळण

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना एक धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे सायली आणि अर्जुन यांच्यातील ठरलेलं कराराचे लग्न म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आज संपले आहे. यामुळेच आता सायली अर्जुनचे घर सोडून निघून जाण्याचा विचार करणार आहे. मात्र, अर्जुन वेळोवेळी सायलीला अडवायचा प्रयत्न करत आहे. परंतु, ‘एक ना एक दिवस ही गोष्ट घडणारच होती. मी तुम्हाला आणि सुभेदार कुटुंबाला सोडून या घरातून निघून जाणारच होते’, असं म्हणत सायली आता मोठं पाऊल उचलणार आहे. मधुभाऊंची केस लढण्यासाठी सायलीने अर्जुनशी लग्न केलं होतं.

ट्रेंडिंग न्यूज

खरंतर अर्जुन हा फार महागडा वकील असल्याने त्याची फी आपल्याला परवडणार नाही, असं सायलीने सुरुवातीलाच त्याला सांगितलं होतं. दुसरीकडे, अर्जुनला प्रियाशी लग्न करायचा नसल्याने त्याने सायलीच्या पुढ्यात लग्नाचा प्रस्ताव ठेवला. हे लग्न केवळ एक करार असेल, मधुभाऊंची केस सुटेपर्यंत आपल्यातील हे कराराचे लग्न कोणालाही खोटं वाटता काम नये, आपण खऱ्या नवरा बायकोसारखं राहायचं, असं या करारात लिहिलेलं होतं. मधुभाऊ हे सायलीला तिच्या वडिलांसमान असल्याने तिने देखील अर्जुनची ही अट मान्य करत त्याच्याशी लग्न केलं होतं. मात्र, हा लग्नाचा करार एक वर्षांसाठीच होता. दोघांच्या लग्नाला एक वर्ष आता पूर्ण झाले आहे. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टमध्ये ठरल्याप्रमाणे आता सायलीला अर्जुनचं घर सोडावं लागणार आहे.

‘मिस युनिव्हर्स’ जिंकून पूर्ण झाला ३० वर्षांचा प्रवास! सुष्मिता सेनने मानले ‘या’ व्यक्तीचे आभार

अर्जुन करतोय सायलीला अडवायचा प्रयत्न

सायलीने याची मनाची तयारी केली असली, तर अर्जुन मात्र स्वतःला सावरू शकलेला नाही. सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले आहेत. मात्र, अद्याप त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही. सायलीला असं वाटत आहे की, तिचं अर्जुनवर एकतर्फी प्रेम आहे. तर, दुसरीकडे अर्जुनला देखील असंच वाटत आहे की, आपलं सायलीवर एकतर्फी प्रेम असून, सायलीच्या मनात काहीही नाहीये. मात्र, दोघेही आपापल्या मनातील या भावना एकमेकांसमोर व्यक्त करायला घाबरत आहेत.

सायली घर सोडून निघून जाणार

याशिवाय त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमध्ये अशीही अट टाकण्यात आली होती की, मधुभाऊंची केस सुटेपर्यंत कोणीही प्रेमात पडणार नाही. त्यामुळे ही अट मोडू नये, म्हणून अर्जुन आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यापासून स्वतःला थांबवत आहे. अर्जुन आपल्याला अडवायचा प्रयत्न करणार, हे माहिती असल्यामुळे सायली आता अर्जुन झोपलेला असताना मध्यरात्री सुभेदारांचे घर सोडून निघून जाणार आहे. यावेळी ती एक चिठ्ठी लिहून अर्जुनला या सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर, सकाळी उठल्यानंतर आपल्या बाजूला सायली न दिसल्यामुळे अर्जुन घाबरून जाणार आहे. त्याचवेळी तिची चिठ्ठी सापडल्याने अर्जुनला मोठा धक्का बसणार आहे. मालिकेच्या येत्या भागात हे कथानक पाहायला मिळणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४