मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Tharala Tar Mag 21st Feb: सायली घेणार चैतन्यची जागा! बनणार अर्जुनला ऑफिसमध्येही देणार साथ

Tharala Tar Mag 21st Feb: सायली घेणार चैतन्यची जागा! बनणार अर्जुनला ऑफिसमध्येही देणार साथ

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 21, 2024 07:36 PM IST

Tharala Tar Mag 21 February 2024 Serial Update: अर्जुन एकटा पडणार हे सायलीला ठावूक होते. त्यामुळेच तिने अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचणार आहे.

Tharala Tar Mag 21 February 2024
Tharala Tar Mag 21 February 2024

Tharala Tar Mag 21 February 2024 Serial Update: ठरलं तर मग’ मालिकेच्या आजच्या भागात प्रेक्षकांना सायली आणि अर्जुन यांच्या नात्यातील वाढती जवळीक पाहायला मिळणार आहे. सायली आता अर्जुनच्या मदतीसाठी थेट ऑफिसला देखील जाणार आहे. साक्षीमुळे चैतन्य आणि अर्जुन यांच्या नात्यात दुरावा आला आहे. इतकंच नाही तर, चैतन्यने अर्जुनच्या ऑफिसमधील नोकरी देखील सोडली आहे. आता चैतन्यने राजीनामा दिल्यानंतर अर्जुन एकाकी पडला आहे. आता त्याला ऑफिसमध्ये एका मदतनीसाची गरज आहे. यासाठी तो एका नव्या व्यक्तीला शोधायला सुरुवात करणार आहे. त्याने ऑफिसमध्ये काही लोकांना मुलाखतीसाठी बोलावलं आहे.

दुसरीकडे, अर्जुन एकटा पडणार हे सायलीला ठावूक होते. त्यामुळेच तिने अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचणार आहे. घरातून बाहेर जाण्याआधी सायली घरातील सगळी कामं पूर्ण करणार आहे. तर, सायली ऑफिसमध्ये जात असल्याचे पाहून अस्मिता पुन्हा एकदा घर अस्ताव्यस्त करणार आहे. यानंतर अस्मिता पूर्णा आजीसमोर जाऊन कांगावा करणार आहे. सायलीने घरातील कामं केली नाहीत आणि ती बाहेर निघून गेली असं अस्मिता पूर्णा आजीला सांगणार आहे. तर यावेळी पूर्ण आजीचा राग अनावर होणार आहे. सायलीने आपल्याला न सांगता घराबाहेर पाऊल ठेवायचं नाही, असा फर्मान पूर्णा आजी काढणार आहे.

Viral Video: ‘असं वाटलं आता मिळणारच नाही’; सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकल्यानंतर शाहरुख खान भावूक!

दुसरीकडे सायली अर्जुनच्या ऑफिसमध्ये पोहोचली आहे. तर, ती आता मुलाखतीसाठी आलेल्या उमेदवारांमध्ये जाऊन बसणार आहे. यावेळी ती अर्जुनसमोर जाऊन आपणही या पदासाठी मुलाखत द्यायला आलोय असं सांगणार आहे. तर, अर्जुन मात्र सायलीला समजावण्याचा प्रयत्न करणार आहे. घरातील सगळी काम आणि बाकी सगळं सांभाळून तुम्हाला हे काम करायला जमणार नाही, असं अर्जुन सायलीला सांगणार आहे. तर, सायली मात्र अर्जुनची ही गोष्ट खोडून काढणार आहे. आता देखील आपण घरातील सगळी कामं उरकूनच ऑफिसमध्ये आलो आहोत. तर, आता परत गेल्यावर देखील काहीच कामं नाहीत, हे ती अर्जुनला सांगणार आहे. सायलीचा हा आत्मविश्वास पाहून आता अर्जुन देखील तिला ही नोकरी देऊ करणार आहे.

आता सायलीला ही नोकरी मिळाली असली, तरी तिचा हा प्रवास सोपा नसणार आहे. अस्मिताच्या नाटकामुळे पूर्णा आजी आता सायलीशी आणखी कडक वागणार आहेत. पूर्णा आजी सायलीला ही नोकरी करू देतील की, नाही हे मालिकेच्या येत्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point