मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अर्जुन देणार थेट धमकीवजा आव्हान! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

अर्जुन देणार थेट धमकीवजा आव्हान! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

Harshada Bhirvandekar HT Marathi
Mar 20, 2024 02:52 PM IST

आपण सायलीला शोधायला गेलो, तेव्हा ती मंदिराच्या मागे बेशुद्ध अवस्थेत आपल्याला सापडली, असं खोटं अर्जुन सुभेदार कुटुंबाला सांगणार आहे.

अर्जुन देणार थेट धमकीवजा आव्हान! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?
अर्जुन देणार थेट धमकीवजा आव्हान! ‘ठरलं तर मग’मध्ये आज काय घडणार?

ठरलं तर मग’ या मालिकेच्या आजच्या भागात अर्जुन सायलीला सुखरूप घरी घेऊन आलेला पाहायला मिळणार आहे. सायली आणि अर्जुन घरी परत आल्यावर सुभेदार कुटुंब त्या दोघांवरही प्रश्नांचा भडीमार करणार आहेत. सायली नेमकी कुठे गेली होती? सायलीला काय झालं होतं? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. दुसरीकडे सायली खरं बोलली, तर आपलं सगळे पितळ उघडे पडेल, या विचाराने प्रिया घाबरलेली आहे. सायलीवर प्रश्नांचा भडीमार होत असताना ती उत्तर देत असताना आता अर्जुन यात उडी घेणार आहे. मात्र, यावेळी अर्जुन सगळ्यांशी खोटं बोलणार आहे.

आपण सायलीला शोधायला गेलो, तेव्हा ती मंदिराच्या मागे बेशुद्ध अवस्थेत आपल्याला सापडली, असं खोटं अर्जुन सुभेदार कुटुंबाला सांगणार आहे. मात्र, सायली गायब होण्याचे कारण प्रियाला माहित आहे. इतका प्रचंड त्रास सहन केल्यानंतर, आता सायलीला आरामाची गरज आहे. सायलीला आराम मिळावा म्हणून अर्जुन तिला तिच्या रूममध्ये जाऊन झोपण्यास सांगणार आहे. अर्जुन सायलीची काळजी करतोय हे बघून प्रियाचा जळफळाट होणार आहे. ती पुन्हा एकदा संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आहे.

moosewala family news : नवजात बाळाच्या जन्मावर पंजाब सरकारने उपस्थित केला प्रश्न! सिद्धू मुसेवालाचे वडील संतापले

प्रिया करणार संधिसाधूपणा

सायली आणि अर्जुन तिथे नाही हे बघून, आता प्रिया पुन्हा सुभेदार कुटुंबात आग लावण्याचा प्रयत्न करणार आहे. यावेळी प्रिया पुन्हा एकदा पूर्णा आजी आणि प्रताप सुभेदार यांच्या मनात चुकीच्या गोष्टी भरवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रिया सगळ्यांसोबत जेवायला बसणार असून, पुन्हा एकदा पूर्ण आजी प्रताप यांचं मन कलुशीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. ‘लाडकी बायको हरवली, तरी त्याने पोलिसांना कसं नाही बोलवलं? यामागे नक्की गणित काय’, असा प्रश्न प्रिया सुभेदार कुटुंबाला करणार आहे.

Nagraj Manjule Web Series: ‘मटका किंग’चं आयुष्य सीरिजमधून उलगडणार; नागराज मंजुळे ओटीटीवर धुमाकूळ घालणार!

अर्जुन देणार इशारा

तर, आता पूर्णा आजी आणि प्रताप प्रियाच्या या बोलण्याला पाठिंबा देत, ‘लाडकी बायको घरात नव्हती, तेव्हा हा सैरभैर झाला होता, बडबड करत होता आणि आता सायली घरात आली आहे, तर हा एका रूममध्ये जाऊन शांत बसला आहे, नेमकं याच्या मनात काय सुरू आहे? हा काय करणार हे कुणालाच कळत नाहीये’, असं दोघेही बोलणार आहेत. तर, इतक्यात सायलीला घेऊन अर्जुन खाली येणार असून, आपण सायलीला त्रास देणाऱ्या व्यक्तीला शिक्षा घडवणारच आहोत, असा धमकी वजा इशारा तो प्रियाकडे बघून देणार आहे. त्यामुळे आता प्रिया देखील हादरून गेली आहे. सायली आणि अर्जुन आता पुढे काय पाऊल उचलणार, हे मालिकेच्या येत्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point